Viral Video : अशी वेळ कोणत्याच माता पित्यावर येवू नये; स्ट्रेचर न मिळाल्याने तरुण लेकाला जमीनीवर फरफट हॉस्पीटलमध्ये नेले

 Hyderabad Viral Video : हैदराबादच्या निजामाबाद जनरल हॉस्पिटलमधील हा व्हिडिओ असल्याचे समजते. @ Dr. Chiguru Prashanth यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. 8 हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 

Updated: Apr 16, 2023, 06:24 PM IST
Viral Video : अशी वेळ कोणत्याच माता पित्यावर येवू नये; स्ट्रेचर न मिळाल्याने तरुण लेकाला जमीनीवर फरफट हॉस्पीटलमध्ये नेले title=

Hyderabad Viral Video : उतार वयात मुलचं वृद्ध माता पित्यांचा आधार असतात. मात्र, अनेकांवर अशी वेळ येती की वृद्ध माता पित्यांनाच आपल्या तरुण मुलाला आधार द्यावा लागतो. मात्र, असा परिस्थीत योग्य मदत न मिळाल्यास वृद्ध आई वडिलांवर अत्यंत वाईट वेळ येते. अशीच एक धक्कादायक घटना हैदराबादमध्ये (Hyderabad) घडली आहे.  स्ट्रेचर न मिळाल्याने आई वडिलांनी तरुण लेकाला जमीनीवर फरफट हॉस्पीटलमध्ये नेले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे (Viral Video). 

हैदराबादच्या निजामाबाद जनरल हॉस्पिटलमधील हा व्हिडिओ असल्याचे समजते. @ Dr. Chiguru Prashanth यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. 8 हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 1 एप्रिल रोजी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक कमेट्स देखील आल्या आहेत. हा फोटो शेअर करताना आरोग्य खात्याला देखील टॅग करण्यात आले होते. यानंतर आरोग्यमंत्री हरीश राव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

निजामाबाद येथील हे आई वडिल आपल्या 40 वर्षाच्या मुलाला घेवून निजामाबाद जनरल हॉस्पिटलमध्ये आलो होते. 31 मार्च रोजी रात्री ते मुलाला घेवून रुग्णालायत आले होते. मात्र, त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले नाहीत. ते रात्रभर मुलाला घेवून वेटिंग एरियात थांबले होते. 

सकाळी डॉक्टरांनी या वृद्ध आई वडिलांना मुलाला वॉर्ड मध्ये घेवून जाण्यास सांगितले. मुलाला चालता येत नव्हते. यामुळे त्यांनी स्ट्रेचर अथवा व्हिलचेअर द्यावे अशी मागणी हॉस्पीटलकडे केली. मात्र, त्यांना  स्ट्रेचर अथवा व्हिलचेअर देण्यात आले नाही. यामुळे या  वृद्ध माता पित्यांनी मुलाला फरफटत वॉर्डमध्ये नेले. 

मुलाला फरफटत नेत असतानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यातकैद करण्यात आला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला धड उभ देखील राहता येत नव्हते. तो त्याच्या आई वडिलांना त्रास देत होता असं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.  

अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा रुग्णालाय प्रशासनाने केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्यमंत्री हरीश राव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल असे बोलले जात आहे. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x