'सांगा मी गाडीत चढू कसा?' एसटी चालकाने हसत हसत मांडली व्यथा, Video तुम्ही एकदा पाहाच!

ST Bus Driver Viral Video: 'सांगा मी गाडीत चढू कसा?' असं म्हणत एसटी चालकाने व्हिडिओतून आपली व्यथा मांडली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 13, 2025, 08:49 AM IST
'सांगा मी गाडीत चढू कसा?' एसटी चालकाने हसत हसत मांडली व्यथा, Video तुम्ही एकदा पाहाच! title=
A disturbing video has gone viral on social media of ST Bus Driver

ST Bus Driver Viral Video:  सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. एका एसटी चालकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एसटी कर्मचा-याने एसटीमध्ये चढू कसा? असा प्रश्न विचारत एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओत त्याने  आपली व्यथा अगदी हसत हसत मांडली आहे. 

एसटीच्या केबिनमध्ये ड्रायव्हरला चढण्यासाठी टप्पे बनवले आहेत मात्र गाडीचा दरवाजा एकीककडे आणि चढण्यासाठी बनवण्यात आलेले टप्पे दुसरीकडे अशी गत झालीय. त्यामुळे सांगा मी आत्ता गाडीत चढू कसा?? असा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून एसटी ड्रायव्हरने विचारला आहे.

एसटी ड्रायव्हरने गंमतीशीर व्हिडिओ बनवत आपल्या समस्येला वाचा फोडली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. तसंच, हे अजब डोकं कोणाचं असा सवालदेखील केला आहे. ड्रायव्हरच्या एसटीबद्दल बोलत आहे ती शिवशाही आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

व्हिडिओत चालक बोलताना दिसत आहे की, पायरी एकीकडे आणि दरवाजा एकीकडे बसवला आहे. आता या पायरीवरुन मी गाडीत कसा चढू, असा हसत हसत सवाल तो करताना दिसत आहे. एसटी चालकाने जरी या सगळ्या प्रकारावर गमतीशीर सवाल केला असला तरी एसटी महामंडळाने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

एसटीचे लोकेशन मिळणार मोबाईलवर

एसटी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लोकेशन मोबाइलवर कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅन्डवर येण्याची वेळ समजणार आहे. एसटीच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीएलटी) बसविले असल्याने अॅपवर बसची माहिती उपलब्ध होणार आहे. राज्यभरात ५० हजार मार्गावर एसटीच्या सव्वालाख फेऱ्या होत असतात. यात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली, मधल्या थांब्यावर एसटी नेमकी कधी येणार याची माहिती मिळत नाही.