Viral Video: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की लोक म्हणाले, 'बरोबर बोललास भाऊ...'

Viral Rickshaw Funny Dialogue News: रिक्षाच्या मागे हरतऱ्हेचे गंमतीशीर डायलॉग लिहिले (Viral Rickshaw Video) आपण पाहतो. कधी आपल्यालाही त्यामागील लॉजिकही कळतं नाही. परंतु सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्ही नेटकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालकाचे (Viral Funny Video) कौतुक कराल. 

गायत्री हसबनीस | Updated: Apr 16, 2023, 04:34 PM IST
Viral Video: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की लोक म्हणाले, 'बरोबर बोललास भाऊ...' title=

Viral Rickshaw Funny Dialogue News: रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेकदा ट्रॅकवर, टॅक्सीवर नाहीतर रिक्षावर (Viral Rickshaw News) भन्नाट असं काहीतरी लिहिलेलं वाचलं असेलच. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये रिक्षावाल्यानं रिक्षाच्या मागे जे काही लिहिलंय ते पाहून तुम्हीही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या याचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीनं रिक्षातून प्रवास करताना समोर उभ्या असलेल्या रिक्षाच्या मागे लिहिला डायलॉग व्हिडीओमध्ये कॅप्चर केला आहे. जो वाचून सोशल मीडियावर या रिक्षा चालकाचे प्रचंड कौतुक केले जाते आहे. तुम्हाला आता उत्सुकता लागून राहिली असेल की नक्की काय रिक्षाचालकानं (Auto Driver News) असं नेमकं लिहिलंय तरी काय? 

रिक्षाच्या मागे कधी कधी इतक्या भन्नाट गोष्टी लिहिलेल्या असतात की आपल्यालाही वाचून आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावी तेवढीच कमी असते. रिक्षा अशी काही नटवली सजवलीही जाते की आपल्याही नकळत आपली नजर त्या रिक्षेकडेच जाते. आपल्यालाही अशा रिक्षा पाहून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्हाला रिक्षाचा मागचा भाग दिसेल ज्याच्या मागे रिक्षाच्या मागील बाजूच्या छोट्याश्या खिडकीवरती 'आपनों से सावधान' (Apno se Savadhan) असा डायलॉग लिहिला दिसेल. 

नेटकऱ्यांचा प्रतिसाद 

या डायलॉगवरून तुम्हालाही कळेल की या डायलॉगमध्ये किती दम आहे ते. हो, अशाच काही प्रतिक्रिया या या व्हिडीओच्या खालीही उमटायला लागल्या आहेत. त्यामुळे सगळीकडेच या व्हिडीओची चर्चा आहे. अनेकजण या व्हिडीओखाली सकारात्मक कमेंट्स करताना दिसत आहेत. काहींनी रिक्षावाल्याच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी बरोबर लिहिलं आहे असं म्हटलंय. या व्हिडीओला पोस्ट (Viral News) करणाऱ्याचेही सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. तर काही जण या रिक्षावाल्याच्या खिल्ली उडवताना दिसत आहेत. 

हटके व्हिडीओ शेअर 

'आपनों से सावधान' असं लिहिणाऱ्या या रिक्षा चालकाला उद्या त्याच्या जवळच्या व्यक्तींकडून धोका मिळेल अशी खोचक टिप्पणीही काहींनी केली आहे. काहींनी रंजक अशा कमेंट्सही केल्या आहेत. @BabaJogeshwari नावाच्या एका ट्विटर युझरनं हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये युझरनं लिहिलं आहे की, फ्रायडे. हा व्हिडीओ 20 सेकंदाचा आहे. याला आत्तापर्यंत 40 हजार व्ह्यूज मिळाले आहेत.