तुम्ही मँगो ज्यूस पिता का? मग हा VIDEO एकदा पाहाच, पिण्याआधी उलटी येईल

Mango Juice Packaging: एका प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने ज्यूस प्रोसेसिंग प्लांटमधील धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हीही दुकानात मिळणारे ज्यूस पिणं बंद कराल.   

शिवराज यादव | Updated: Aug 30, 2024, 09:11 PM IST
तुम्ही मँगो ज्यूस पिता का? मग हा VIDEO एकदा पाहाच, पिण्याआधी उलटी येईल title=

Mango Juice Recipe: मँगो ज्यूस म्हटलं की लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. गेल्या अनेक दशकांपासून अनेकांचं हे आवडतं ड्रिंक राहिलं आहे. लोकांनी ड्रिंक विकत घ्यावं यासाठी कंपन्याही आकर्षक जाहिराती आणि टॅगलाइन तयार करतात. दुसरीकडे अनेक सेलिब्रिटी या बाटली किंवा पाकिटबंद ज्यूसचं प्रमोशन करत असतात. खासकरुन उकाड्याच्या दिवसांमध्ये लोक या ड्रिंक्सला जास्त पसंती देतात. अनेकदा लहान मुलं हट्ट करत असल्याने पालक मुलांच्या हातात हे ड्रिंक सोपवतात. पण असं करताना आपण किती मोठी चूक करत आहोत याची जाणीव खऱंतर कोणालाच नसते. हे ड्रिंक आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकतं हे दर्शवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मँगो ज्यूस म्हटलं जात असलं तरी त्यात खरंच आंब्याचा वापर केलेला असतो का? हा विचार तुम्ही कधी केला आहे का? यादरम्यान एका कंटेंट क्रिएटरने सोशल मीडियावर ज्यूस प्रोसेसिंग प्लांटमधील शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

व्हिडीओमध्ये पिवळा द्रव लाल आणि केशरी रंग, साखरेचा पाक आणि इतर रसायनांसह पावडर मशीनमध्ये मिसळला जात आहे. त्यानंतर, प्रक्रिया केलेले द्रव पाकिटांमध्ये भरलं जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. 

शेवटी, ते एका मोठ्या कार्टनमध्ये पॅक केले जातात आणि मजुरांच्या मदतीने विक्रेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केले जातात. "Tetra Pack Mango Juice" या कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

व्हिडिओ पोस्ट होताच, अनेकांनी त्यावर कमेंट केल्या असून अक्षरश: पूर आला आहे. टेट्रा पॅक तयार करण्यापासून ते पॅकेजिंगपर्यंत सर्व काही पाहिल्यानंतर लोकांची झोपच उडाली आहे. ही प्रक्रिया पाहून सर्वांनी निराशा व्यक्त केली.

व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

एका युजरने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, "मी सोशल मीडियासाठी देवाचे आभार मानतो. मी अनेक चवदार पदार्थ खाणे किंवा पिणे बंद केले आहे. हे सर्व 200 टक्के स्वादिष्ट फळांचे रस मी आता पिऊ शकत नाही". एका युजरने यामध्ये आंबा सोडून सगळं काही आहे असं म्हटलं आहे. तसंच एकाने हे धीम्या गतीचं विष असल्याची कमेंट केली आहे. अनेकांनी तर आपण यापुढे बाटली किंवा पाकिटबंद ज्यूस पिणार नसल्याचं सांगितलं आहे.