'म्हणे एन्ट्रीसाठी गाणं नाही ढोल वाजव...' हट्टी नवरीचा व्हिडीओ व्हायरल

यामध्येही नववधू आपल्या आवडीचे संगीत वाजत नसल्यामुळे लग्नात एन्ट्री करत नाही आहे.

Updated: Jan 28, 2022, 07:09 PM IST
'म्हणे एन्ट्रीसाठी गाणं नाही ढोल वाजव...' हट्टी नवरीचा व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : आता लग्नात वधूची एंट्री हे लग्नाचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ज्यामुळे आता लग्नात डेकोरेशन करणारे लोकं, त्याला लग्नाच्या पॅकेजमध्ये समावेश करु लागले आहेत. वधुची एन्ट्री लग्नाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यासाठी नियोजन अगोदरपासूनच सुरू होते आणि ते लग्नाच्या दिवसापर्यंत सुरू असते. गेल्या वर्षी आपण एका नववधूचा व्हिडीओ पाहिला असेल जिने तिचे पसंतीचे गाणे वाजवले नाही, म्हणून ऐन्ट्री करण्यास नकार दिला. त्यानंतर याच्याशी संबंधीत अनेक व्हिडीओ देखील आपण पाहिले. परंतु आज ज्या व्हिडीओबद्दल आम्ही बोलत आहोत. तो व्हिडीओ थोडा वेगळा आहे.

यामध्येही नववधू आपल्या आवडीचे संगीत वाजत नसल्यामुळे लग्नात एन्ट्री करत नाही आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नववधू लग्नासाठी एन्ट्री करायला तयार होऊन बसली आहे. तिच्या मेकअपला फायनल टच दिला जात आहे. दरम्यान, ती तिच्या एन्ट्रीच्या गाण्याबाबत तिच्या कुटुंबातील सदस्यांना प्रश्न विचारते.

व्हिडीओमध्ये तुम्ही वधूला म्हणताना ऐकू शकता, 'मी कोणत्याही गाण्यात एन्ट्री करणार नाही, मला ढोल पाहिजे आहे, त्याच ढोलच्या तालावर मी प्रवेश करेन.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लोकांना हट्टीपणा आवडला

नववधूच्या हट्टीपणाचा हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंत केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून लोक मजा घेत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला खुप लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक अनेक मजेशीर कमेंटही करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला जात आहे.