viral video on social media : सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असतो असं म्हटलं जात. लहानपणी आपण शाळेत असताना नेहमी शुद्धलेखन लिहायला लावेल जायचं. आपलं हस्ताक्षर सुंदर व्हावं हा यामागचा उद्देश असायचा. सुंदर हस्ताक्षरामुळे शाळेत आपलं कौतुकही व्हायचं शिवाय परीक्षेत चांगले गुणही मिळतात.
सध्या सोशल मीडियावर (social media ) एक व्हिडीओ तुफान व्हायरल (viral) होत आहे ज्याची सगळीकडे चर्चा होतीये. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअर (video sharing) सुद्धा केलाय.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती हातातील पेनाने कागदावर काहीतरी लिहितो आहे. तो जे काही लिहीत आहे ते इतकं सुबक आणि सुंदर आहे कि पाहताच रहावस वाटेल . पाहणारे तर या व्यक्तीची तुलना कॉम्प्युटरसोबतच (computer) करत आहेत.
हा व्हिडिओ ट्विटर वापरकर्त्याने (twitter user) @TansuYegen ने शेअर केला आहे आणि लिहिले आहे - कॅलिग्राफी (caligraphy) ही कला का आहे याचा हा पुरावा आहे. या क्लिपला आतापर्यंत 46 लाखांहून अधिक व्ह्यूज (video views) आणि 1 लाख 77 हजार लाईक्स (video likes) मिळाले आहेत. आणि हो, सहकाऱ्याचे हस्ताक्षर पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. तो कमेंट सेक्शनमध्ये आपले हृदय लिहित आहे. जसे एका वापरकर्त्याने लिहिले की हस्ताक्षर किती सुंदर आहे. तर इतरांनी लिहिले की, असे हस्ताक्षर पाहून शिक्षक असेच पास होतील!
The proof why Calligraphy is an art pic.twitter.com/NeZEz7bwRj
— Tansu YEĞEN (@TansuYegen) October 6, 2022
40 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक माणूस कॉपीवर इतक्या सुंदर पद्धतीने लिहिताना दिसतो की जणू त्याच्या पेनमधून मोतीच बाहेर पडत आहेत असं वाटू लागत. अश्या सुंदर हस्ताक्षरासाठी किती सराव करणं महत्वाचं आहे हे यावरून कळतंय.
हा व्हिडीओ पोस्ट (video post)केल्यानंतर अनेकांनी छान प्रतिक्रिया दिल्या आहेत एक युझर म्हणतो असं काही लिहिलं तर परीक्षेत असाच पास होईन काहींनी तर म्हटलंय का असं वाटत आहे कि या व्यक्तीने कॉम्प्युटरवरून फॉन्ट कॉपी करून छापलयं असं दिसत आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा पहा तुमचं अक्षर कसं आहे आणि नसेल चांगलं तर हा व्हिडीओ पाहा.