शामली : लग्न हा सगळ्यांसाठी महत्वाचा क्षण असतो, त्यात नवरी आणि नवऱ्यासाठी तो आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. लग्नासाठी नवरीची देखील जय्यत तयारी सुरु असते, कारण या दिवसासाठी नवरीला खूप चांगल तयार व्हायचं असतं. खूप सुंदर दिसायचं असतं. त्यासाठी नवरी खूप शॉपिंग करते आणि खूप सारे कपडे आणि नवीन दागिने देखील घेते. सोन्याचे दागिने घेणे तसे, सगळ्यांनाच शक्य होत नाही, त्यामुळे सगळे जण आपआपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे दागिने घेतात. परंतु सोन्याचे दागिने घालून फिरणाऱ्या नवरीचा रुबाबच वेगळा असतो.
यूपीमधील शामली येथे देखील असाच एका नवरीचा थाट पाहायला मिळाला. जिथे नवरी मुलगी काही कोटी रुपयांचे दागिने घालून लग्नात बसली होती. तिच्या अंगावर इतके दागिने होते की, तिचे संपूर्ण शरीर या दागिन्यांनी झाकूण गेले होते. जे पाहून तुम्ही देखील थक्कं व्हाल.
परंतु एवढे दागिने घालणे त्यांना खूप महागात पडले आहे. कारण त्यामुळे या लग्नात पोलिसांनी छापा टाकला आहे. 15 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वधूला लग्नाचे गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने दिले आहेत. त्याचबरोबर वधू आधीच अंगावर बरेच दागिने घालून बसलेली दिसत आहे. या व्हिडीओत वधूला काही रोख रक्कम देखील दिली आहे.
हा व्हिडीओ पोलिसांनी पाहाताच घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाची चौकशी केली. अद्याप हा व्हिडीओ कोणत्या दिवसाचा आहे हे स्पष्ट झाले नाही. परंतु पोलिस या प्रकरणाच्या चौकशीत व्यस्त आहेत.
पोलिल अमित सक्सेना म्हणाले की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता यावर कारवाई केली जात आहे. हा व्हिडीओ सुमारे 2 महिन्यांपूर्वीचा सांगण्यात येत आहे. आयकर विभागालाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
IT dept roped in after vulgar display of wealth in the form of dowry in a UP's Shamli wedding. Bride is also laden with heavy gold jewellery. Police has begun investigation @Uppolice pic.twitter.com/ZrsMldtxFt
— Sandeep Rai (@RaiSandeepTOI) June 27, 2021
लग्नात इतक्या मोठ्या रकमेचे शगून देण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी कॅरानामधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये वराच्या डोक्यावर हात ठेवून त्याला 26 लाख रुपये देण्यात आले होते. त्या व्हिडीओवरही लोकांमध्ये बरीच चर्चा झाली होती.