नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुलगामच्या चिमर भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्या जोरदार चकमक सुरु आहे. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई करत दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. ताज्या माहितीनुसार दहशतवाद्यांविरोधात पोलीस आणि सुरक्षा दलाकडून ऑपरेशन सध्या सुरु आहे. या मोठ्या कारवाईनंतर आणखी काही दहशतवादी लपल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने कारवाई सुरु आहे.
दरम्यान, पुलवामा येथे रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांनी आईच्या मांडीवरुन दहा महिन्यांच्या बाळाला पळवून जमिनीवर आपटले. त्यातील एका दहशतवाद्यांची ओळख पटली असून तो पाकिस्तानी आहे. दहशतवाद्यांनी माजी विशेष पोलीस अधिकारी फैज अहमद भट ( 50) यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.
Jammu and Kashmir: Encounter begins at Chimmer area of Kulgam. Police and security forces are carrying out the operation. Details awaited.
— ANI (@ANI) June 30, 2021
तसेच जम्मू-काश्मीरमध्ये संशयास्पद ड्रोन सतत दिसत आहेत. मंगळवारी रात्री सलग चौथ्या दिवशी सीमेजवळ ड्रोन दिसले. शनिवारी रात्री जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन स्फोट झाल्याच्या घटनेनंतर ड्रोन सतत दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, एक ड्रोन पहाटे 4 वाजून 40 वाजता कालूचक भागात तर दुसरा ड्रोन कुंजवानी येथे पहाटे 4.52 वाजता दिसला.
सीमेवर हे सलग चार दिवस असून ड्रोन दिसत आहेत. जम्मू एअरफोर्स स्टेशनवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यापासून ड्रोन सतत दिसत आहेत. लष्करी तळ आणि लष्करी स्थानकाजवळ असे सर्व ड्रोन दिसत आहेत.