Shocking News : उत्तर प्रदेशमधून ( UP News) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. कानपूरच्या (Kanpur) जालनमध्ये आत्महत्येचे नाटक करणाऱ्या एका मुलाचा आईसमोरच जीव गेला आहे. कानपुरच्या जालौनमध्ये एका 13 वर्षाच्या मुलाला खेळताना जीव गमवावा लागला आहे. एका चुकीने मुलाचा जीव घेतला आहे. मृत मुलगा आत्महत्येचे नाटक करत होता. अचानक स्टूलवरुन कोसळल्याने मुलाच्या गळ्याला गळफास बसला आणि त्याचा जीव गेला. जेव्हा तो फासावर लटकला होता तेव्हा त्याच्या तीन लहान भाऊ आणि बहिणींना वाटत आहे की तो नाटक करत होता. त्यानंतर त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत असल्याचे त्यांनी पाहिले आणि आरडाओरड सुरु केली. मुलांचा आवाज ऐकून आईला जाग आली. आईने मुलाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
हृदयद्रावक बाब म्हणजे मृत मुलाची आई पाहू शकत नाही. तिला जन्मापासून दिसत नव्हते. अशातच तिच्यासमोरच मुलाचा जीव गेला. मुलाला फास लागलेली दोरी कापण्यासाठी ती चाकू शोधत राहिली पण तो सापडलाच नाही. यानंतर तिने शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता ती दुर्दैवी आई स्वतःलाच शाप देत आहे की तिला दिसले असते तर तिने मुलाला वाचवले असते.
आईने स्वतःला दिला दोष
जालनच्या ओराई येथील कांशीराम कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. संगीता असे या दुर्दैवी आईचे नाव आहे. रविवारी संगीता यांनी मुलगा जसच्या मृत्यूनंतर आपल्या नशिबाला दोष देत आहेत. "देवाने माझी दृष्टी हिरावून घेतली नसती तर मला माझ्या मुलाला वाचवता आले असते. त्याचा माझ्यासमोर मृत्यू झाला आणि मी काहीच करू शकले नाही, असे म्हणत संगीता यांनी हंबरडा फोडला. पाचवीत शिकणारा जस हा घरी त्याच्या भावंडांसोबत खेळत असताना हा अपघात घडला.
अपघाताच्या दिवशी संगीता ही दुसऱ्या खोलीत झोपली होती. त्यावेळी संगीताचा पती हा कामावर गेला होता. खेळता खेळता त्यांनी आत्महत्येचा खेळ करण्याचा ठरवलं आणि हा सगळा दुर्दैवी प्रकार घडला. या खेळासाठी मुलांना सगळी तयारी केली होती. मात्र त्याचवेळी जस उभा असलेला टेबल बाजूला जाऊन पडला आणि त्याच्या गळ्याला फास बसला. यानंतर त्याचा श्वास कोंडू लागल्याने तो हातपाय हलवू लागला. त्याच्या भावंडांना मात्र जस नाटक करतोय असं वाटत होतं. मात्र त्याच्या नाकातोंडातून जेव्हा रक्त येऊ लागलं तेव्हा त्यांनी आरडाओरडा सुरु केला.
मुलांचा आरडाओरडा ऐकून संगीताला जाग आली. त्यानंतर ती चाचपडत दुसऱ्या खोली गेली. तेव्हा जसच्या गळ्याला फास बसला होता. ती कशीतरी त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करु लागली. त्यानंतर तिने स्वयंपाकघरात धाव घेतली आणि चाकू शोधू लागली. मात्र तिला चाकू मिळत नव्हता आणि तोपर्यंत जसचा जीव गेला होता. काही मिनिटांनी शेजारी आले तेव्हा त्यांनी जसच्या गळ्याला बसलेला फास सोडवला आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषिक केले.