मुंबई : केंद्र सरकारने आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे सर्वांसाठीच बंधनकारक केले आहे. परंतु अद्यापही बर्याच लोकांनी आपल्या पॅनकार्डला आधारशी लिंक केलेले नाही. यापूर्वी पॅनकार्डला आधारकार्ड जोडण्याची शेवटची तारीख 30 जून होती, जी आता तीन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत करण्यात आली आहे. तुम्ही जर अद्याप हे जोडले नसेल तर, ते आताच पूर्ण करा. कारण जर तुमचा आधारकार्ड हा पॅनकर्डशी जोडलेला नसेल तर, तुमचा पॅनकार्ड सक्रिय होणार नाही, ज्याचा भविष्यात तुम्हाला खूप त्रास होईल.
सध्या बँकाही आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी लोकांना जागरूक करत आहेत. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? की, देशातील काही विभाग किंवा नागरिक आहेत ज्यांना यातून सूट देण्यात आली आहे. ज्यांच्यासाठी आधार-पॅन जोडणे बंधनकारक नाही.
त्यामुळे अशा परिस्थितीत जाणून घ्या की, आधार आणि पॅन कार्ड सक्तीने जोडण्याच्या प्रक्रियेत कोणत्या लोकांना सूट देण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ग्राहकाने केलेल्या ट्विटला उत्तर देताना बँकेने या नियमांबद्दल सांगितले की, आसाम, मेघालय, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात राहणाऱ्या लोकांना यातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय आयकर कायदा 1961 नुसार नॉन रेसिडेन्टना यातून सूट देण्यात आली आहे.
याशिवाय मागील वर्षी 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना, या नियमांपासून दूर ठेवले गेले आहेत. तसेच जे भारताचे नागरिक नाहीत, त्यांना देखील आधार आणि पॅनकार्ड जोडण्याची गरज नाही.
या लोकांव्यतिरिक्त, सर्व लोकांना पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक आहे. जर आपण देखील वरीलपैकी कोणत्याही श्रेणीत नसल्यास तुम्हाला तुमचे आधार-पॅन कार्ड जोडणे बंधनकारक आहे. वास्तविक, जर तुमचा पॅन आधारशी जोडलेला नसेल तर तुम्हाला आर्थिक सेवेत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
-पॅन-आधारला लिंक करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे नवीन आयकर वेबसाइटला भेट देणे.
-यासाठी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal वर भेट द्यावी लागेल.
-यानंतर उपलब्ध असलेल्या सुविधांमधून 'Link Aadhar' वर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. यात आपल्याला पॅन नंबर, आधार क्रमांक, आपले नाव आणि आधार वर उपस्थित मोबाइल नंबर भरावा लागेल.
-जर तुमच्या आधारवर फक्त जन्म वर्ष लिहिले असेल तर, तुम्हाला ‘I have only year of birth in Aadhaar card’ हा पर्याय निवडावा लागेल.
-यानंतर, 'I agree to validate my Aadhaar details' असे लिहिलेल्या बॉक्सवर क्लिक करुन त्याला Okay करा.
-मग 'Link Aadhar' वर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज उघडेल. यात तुम्हाल दिसेल की, तुमचा आधार क्रमांक पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाला आहे.