Trending Video : चोरीच्या अनेक घटना आपण पाहात असतो, ऐकत असतो. पण कर्नाटकची (Karnataka) राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये (Bengaluru) चोरीचा लाईव्ह थरार पाहिला मिळाला. अगदी चित्रपटाला शोभेल असा हा कारनामा होता. बाईकवरुन आलेल्या चोरट्यांनी अवघ्या काही सेकंदात एका कारमधून लाखो रुपयांची रोकड लंपास केली. धक्कादायक म्हणजे दिवसाढवळ्या ही घटना घडली आणि याचा कोणालाच थांगपत्ता लागला नाही. परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीमुळे (CCTV) ही घटने उजेडात आली चोरीच्या या लाईव्ह थराराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
चोरीचा लाईव्ह थरार
बंगळुरुमधली ही घटना आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत निळ्या रंगाची एक बीएमडब्ल्यू कार रस्त्यावर एकेठिकाणी उभी असल्याचं दिसतंय, याचवेळी दुचाकीवरुन दोन चोर येतात आणि कारच्या बाजूला थांबवतात. यातला एक चोर दुचाकीवरुन उतरुन कारची आणि आसपासच्या परिसराची टेहाळणी करतो. त्यानंतर संधी साधत तो बीएमडब्ल्यू कारची काच फोडतो त्यानंतर कारमधल्या पुढच्या सीटवर असलेली एक पिशवी उचलून तो दुचाकी बसून फरार होतो. चोरीची ही घटना अवघ्या पन्नास सेकंदात घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार या पिशवती 13.75 लाख रुपये होते.
बंगळुरुच्या सरजापूर इथल्या सोमपूरामधल्या रजिस्ट्रर कार्यालयजवळची ही घटना आहे. विशेष म्हणजे चोरीची घटना दिवसाढवळ्या घडली. पण याचा कोणाला थांबपत्ताही लागला नाही. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरुमधल्या अनेकलमधल्या मोहन बाबू यांची ही लक्झरी कार होती. मोहनबाबू यांनी मुथागट्टी गावातील एक जमीन विकत घेतली होती. जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी मोहनबाबू यांनी कॅश आपल्या कारमध्ये ठेवली होती.
मोहनबाबू आणि त्यांचे नातेवाईक रमेश हे दोघं दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास रजिस्ट्रार कार्यालयाजवळ आपली बीएमडब्ल्यू कार पार्क केली. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कार्यालयातील काम आटोपून मोहनबाबू आपल्या कारजवळ आले. पण कारजवळ येताच त्यांना धक्का बसला. कारची पुढची काच त्यांना फुटलेली आढळली. त्यांनी तात्काळ कार तपासली असता कारच्या पुढच्या सीटवर ठेवलेली 13 लाखांची पिशवी गायब असलेली दिसली. त्यांनी तात्काळ याची माहिती सरजापुरा पोलिसांनी दिली.
BMW Window broken by 2 men to rob Rs 13.75 lakh cash near sub-registrar's office in Sompura, Sarjapur. pic.twitter.com/zY8oXrXfSO
— Harsh (@Edsh4rsh) October 22, 2023
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरीचा तपास सुरु केला. आसपासच्या परिसराचे सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांना चोरी केल्याचं आढळलं. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.