सर्व फोटो काढत होते म्हणून मी सुद्धा काढला, हे कोण आहेत? अनंत अंबानीला न ओळखणारी तरुणी ट्रोल

Trending News : उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधीका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा 29 मे ते 1 जूनदरम्यान पार पडणार आहे. यादरम्यान सोशल मीडियावर अनंत अंबानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजीव कासले | Updated: May 29, 2024, 04:38 PM IST
सर्व फोटो काढत होते म्हणून मी सुद्धा काढला, हे कोण आहेत? अनंत अंबानीला न ओळखणारी तरुणी ट्रोल title=

Trending Video : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातच नाही तर संपूर्ण आशियातले श्रीमंत व्यक्ती आहेत. जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्येही मुकेश अंबानी यांचा टॉप टेनमध्ये समावेश होतो. सध्या मुकेश अंबानी यांचा मुलगाही चर्चेत आहे. उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधीका दुसरा प्री वेडिंग सोहळा (Anant-Radhika Pre Wedding)  29 मे ते 1 जूनदरम्यान पार पडणार आहे. इटली आणि फ्रान्समध्ये एका अलिशान क्रुझवर हा सोहळा रंगणार असून यासाठी अंबानी कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक आणि विविध क्षेत्रातले सेलिब्रेटी सहभागी होणार आहेत. याासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

अनंत अंबानी आणि राधीका मर्चंटचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधल्या जामनगरमध्ये पार पडला होता. त्यावेळीदेखील कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. आता दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचीही तितकची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या अनंत अंबानी ट्रेंडमध्ये आहे. यादरम्यान अनंत अंबानी याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत अनंत अंबानी अमेरिकेतल्या एका रस्त्यावर आपल्या पाळीव कुत्र्यासह फिरताना दिसत आहे. अनंत अंबानींभोवत सुरक्षेचं कडंही दिसतंय. अनंत अंबानीबरोबर अनेकजण फोटो काढतानाही या व्हिडिओत दिसतंय. यादरम्यान एका तरुणीनेही अनंत अंबानीबरोबर फोटो काढताना दिसत आहे. पण या तरुणीला आपण कोणाबरोबर फोटो काढतोय याचीच माहिती नाहीए. स्वत: या तरुणीने आपल्या इन्स्टाग्रमवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

हा व्यक्ती कोण आहे?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक तरुणीन अनंत अंबानीबरोबर फोटो काढताना दिसतेय. अनंत अंबानी आपल्या पाळिव कुत्र्यासह अमेरिकेतल्या रस्त्यावर फिरताना दिसतोय. यावेळी तरुणीने अनंत अंबानीबरोबर फोटो काढला. यानंतर हा फोटो तरुणीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. यासोबत तीने एक पोस्टही शेअर केली आहे. यात तीने म्हटलंय. या व्यक्तीबरोबर मी फोटो काढला, कारण अनेक जण त्यांच्याबरोबर फोटो काढत होते. पण या व्यक्तीला मी ओळखत नाही. तुम्ही सांगू शकाल का ही व्यक्ती कोण  आहे? 

या मुलीने पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर तीला ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bethany Zesu (@beth_zesu)

युजर्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ Bethany Zesu नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 12 मिलिअन पेक्षा जास्तवेळा पाहायला गेलाय. तर 1 लाख 87 हजार जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. यावर अनेक युजर्सने कमेंटही केली आहे. एका युजरने म्हटलंय, ज्या व्यक्तीबरोबर तू फोटो काढला आहे तो व्यक्ती तुझ्या पुढच्या 100 पिढ्या विकत घेऊ शकतो. तर एका युजरने म्हटलंय या व्यक्तीची पॉकेटमनीच पाकिस्तानच्या एकूण जीडीपीपेक्षा जास्त आहे. एका युजरने या व्यक्तीचं नाव अनंत अंबानी आहे असं सांगितलंय.