पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलांनी तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे. हे दहशतवादी लश्कर-ए-तोयबाशी संघटनेशी जोडलेले होते. काल रात्रीपासून ही चकमक सुरू होती.
सुरक्षा दलाला माहिती मिळताच काकापोरा भागात नाकाबंदी केली गेली. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमत सुरू झाली. खुप वेळ चाललेल्या या चकमकीत सुरक्षा दलाला दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालं.
दहशतवाद्यांकडून तीन एके-४७ आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला. या चकमकीत मारले गेलेले अतिरेक्यांची नावे माजिद मीर, शाकीर आणि शबीर अहमद अशी आहेत. माजिद मीरवर काकापोराचे सरपंच आणि जिल्हा अध्यक्ष यांच्यासह अनेक जणांचा खून केल्याचा आरोप होता.