४०० फूट खोल दरीत फेकूनही तो बचावला...

बीएससीच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच एका मित्राने ४०० फूट दरीत फेकून दिल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 13, 2018, 03:08 PM IST
४०० फूट खोल दरीत फेकूनही तो बचावला... title=

इंदोर : बीएससीच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच एका मित्राने ४०० फूट दरीत फेकून दिल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र पाच दिवसांनी त्याल्या बाहेर काढण्यात आले. आश्चर्य म्हणजे तो जिवंत आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. 

कोण आहे तो विद्यार्थी?

या पीडित विद्यार्थ्याचे नाव मृदुल भल्ला असून तो इंदोरमध्ये शिक्षणासाठी आला होता. रविवारी त्याच्या  सोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याचे अपहरण केले आणि नंतर त्याला दूर जंगलात फेकून देण्यात आले. 

मृदुल भल्ला हा इंदोरमधील एका कॉलेजमध्ये बीएससी चे शिक्षण घेत होता. मात्र रविवारी अचानक तो गायब झाला. याची माहिती मृदुलसोबत राहणाऱ्या एका मुलाने पोलीसांना दिली. त्याचबरोबर त्याने मृदुलाच्या घरच्यांनाही तो गायब असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला. मृदुलला तीन मुलांनी कारमध्ये घालून नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले. त्यात मृदुलसोबत शिकणारा एक विद्यार्थीही होता.

अपहरण केल्यानंतर ५ दिवसांनी मृदुल गंभीर अवस्थेत खुडैल येथील जंगलात सापडला. त्याचे हात-पाय बांधलेले होते आणि तो अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी झाला होता. 

का उचलले हे पाऊल?

मृदुलच्या वडिलांनी सांगितले की, मृदुलचे अपहरण त्याच्या सोबत शिकणाऱ्या त्याच्याच एका मित्राने जोंटीने केले होते. आरोपी जोंटीचे त्याच्यासोबत शिकणाऱ्या एका मुलीवर अंजलीवर प्रेम होते. मात्र मृदुलचे तिच्यासोबत प्रेमसंबंध आहेत, अशी त्याला शंका होती. यामुळे रागात त्याने आपल्या ३ मित्रांना साथीला घेऊन मृदुलचे अपहरण केले आणि मग त्याला जंगलात फेकून दिले. 

पोलीसांनी आरोपी जोंटी व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आरोपीने मृदुलला ४०० फूल खोल दरीत फेकले होते. मात्र त्याचे नशीब बलवत्तर म्हणूनच तो बचावला.