उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरात शिरला चोर; जाता जाता असं काही लिहून गेला की.....

घटनेनं सध्या अनेकांचंच डोकं भांडावून सोडलं आहे

Updated: Oct 11, 2021, 02:19 PM IST
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरात शिरला चोर; जाता जाता असं काही लिहून गेला की..... title=
प्रतिकात्मक छायाचित्र

भोपाळ : दिवसाढवळ्या चोऱ्या होण्याचं प्रमाण अद्यापही कमी झालेलं नाही. मुळात चोरी होण्यच्या घटना कमी होण्याचं नावच घेत नाहीयेत. उलटपक्षी चोरीचे धडकी भरवणारे अनेर प्रकार सध्या उघडकीस येताना दिसत आहेत. अशाच एका घटनेनं सध्या अनेकांचंच डोकं भांडावून सोडलं आहे. जिथं मध्य प्रदेश येथे चोर थेट उपजिल्हाधिकाऱ्यांच्याच घरात शिरला होता.

देवास जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी त्रिलोचन गौर यांचं घर एका उच्चभ्रू वस्तीत आहे. त्यांचंच नव्हे तर या भागात पोलीस महासंचालकांचंही घर आहे. पण, जे व्हायचं होतं ते मात्र कोणालाही टाळता आलं नाही. चोरानं डल्ला मारण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरात एंट्री केली. पण, त्याला तिथं त्याची निराशा झाली. मग, काय.... चोरानं एक पत्रच उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी लिहिलं.

जर पैसेच नव्हते. तर घर कुलुपबंद तरी का केलं, कलेक्टर.....?  असं त्या चोरानं लिहिलं आणि तो म्हणे तिथून पसार झाला. कोतवाली पोलिस स्थआनक प्रमुख उमराव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिलोचन सिंह गौर यांच्या घरातून 30 हजार रुपये रोकड आणि काही दागिन्यांचा ऐवज चोरीला गेला. गौर एका रात्रीच्या विरामानंतर घरी परतले त्यावेळी त्यांच्यासमोर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार हातानं लिहिलेल्या या चिठ्ठीसाठी चोरानं अधिकाऱ्यांचीच वही आणि पेन वापरला. सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं यासंदर्भातील तपास सुरु केला.