दुर्दैवी! ऑनलाईन गेमिंगचा आणखी एक बळी, डॉक्टर होण्याचं स्वप्नही अपूर्णच राहिलं...

ऑनलाईन गेममुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न अधूरंच राहिलं, परीक्षेआधीच त्याने स्वत:ला संपवलं

Updated: Jul 12, 2022, 12:42 PM IST
दुर्दैवी! ऑनलाईन गेमिंगचा आणखी एक बळी, डॉक्टर होण्याचं स्वप्नही अपूर्णच राहिलं... title=

कोटा : त्याला डॉक्टर व्हायचं होतं त्यासाठी परीक्षेची तयारी करायची होती. डोळ्यात मोठी स्वप्न होती. ऑनलाईन गेमिंगचा नाद लागला आणि सगळंच मागे पडलं. ऑनलाईन गेमिंगबाबत युवकाला समजावूनही पुन्हा गेम खेळायला लागला. परीक्षेचा अभ्यास मागे राहिला आणि गेमिंगचा नाद लागला. याच दबावातून युवकाने आयुष्य संपवलं.

घरापासून कोसो दूर स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या 16 वर्षांच्या युवकाने आयुष्य संपवलं आहे. हा मुलगा अंदमान निकोबार इथला निवासी असल्याची माहिती मिळाली आहे. आई वडिलांनी त्याला कोटा इथे NEET च्या तयारीसाठी पाठवलं होतं. 17 जुलै रोजी त्याची परीक्षा होती. परीक्षेत मार्क कमी पडतील या भीतीने त्याने आयुष्य संपवल्याची चर्चा आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. 

हा युवक 16 वर्षांचा असून तो कोटामध्ये हॉस्टेलमध्ये राहात होता. त्याला फ्री फायर गेम खेळण्याची सवय लागली. याबाबत त्याच्या पालकांकडे तक्रार केली. त्यानंतर पालकांनी त्याची समजून घातली. फ्री फायर गेम खेळू नये असं सांगितलं. त्यावर त्याने मी चांगले मार्क आणेन आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करेन असं आई-वडिलांना वचन दिलं. 

आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलाचा मृतदेह पाहून आई पूर्ण कोलमडून गेली. फ्री फायर गेम खेळण्यासाठी कोणीतरी दबाव आणत असल्याचा आरोप मृत युवकाच्या आईनं केला आहे. या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.