नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के टी थॉमस यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
संविधान, लोकशाही आणि सशस्त्र सेनेनंतर आरएसएसनंच भारतीयांना सुरक्षित ठेवलंय, असं विधान टी के थॉमस यांनी केलंय. धर्मनिरपेक्षतेचा विचार धर्मापासून दूर ठेवला जाऊ नये, असंही त्यांनी म्हटलंय.
३१ डिसेंबर रोजी कोट्ट्यममध्ये संघाच्या प्रशिक्षण कॅम्पला संबोधित करताना माजी न्यायमूर्ती थॉमस यांनी, देशाला सुरक्षित ठेवण्याचं श्रेय आरएसएसला दिलंय.
'आपात्कालीन परिस्थिती देशाला स्वतंत्र करण्याचं श्रेय एखाद्या संस्थेला द्यायचं असेल तर ते मी आरएसएसला देईल' असं थॉमस यांनी म्हटलंय.
आरएसएसचं शारीरिक प्रशिक्षण कोणत्याही हल्ल्याच्या वेळी देश आणि समाजाच्या रक्षणासाठी असल्याचं थॉमस यांनी म्हटलंय.
अल्पसंख्यांक धर्मनिरपेक्षता आपल्या संरक्षणासाठी वापरतात परंतु, धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत त्यापेक्षा अधिक आहे... याचा अर्थ आहे की प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाचं संरक्षण व्हायला हवं.