गीता श्लोक म्हटल्याने मुलीविरोधात फतवा

आलीया खान हिने एका स्पर्धेमध्ये गीता श्लोक म्हटले होते. याचा त्रास तिला सहन करावा लागला. 

Updated: Jan 4, 2018, 03:56 PM IST
गीता श्लोक म्हटल्याने मुलीविरोधात फतवा title=

लखनौ : गीता श्लोक म्हणणाऱ्या मुलीविरोधात फतवा काढल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.  दारूल उलून देवबंदने हा फतवा काढला आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनूरमध्ये हा प्रकार घडला आहे. आलीया खान असे या मुलीचे नाव आहे. 

आलीया खान हिने एका स्पर्धेमध्ये गीता श्लोक म्हटले होते. याचा त्रास तिला सहन करावा लागला. 

इस्लामविरोधी 

मुस्लिम विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे वागणे हे इस्लामविरोधी असल्याचे मत दारूल उलूमचे ऑनलाईन फतवा विभागाचे चेअरमन मुफ्ती अरशद फारुकी यांनी म्हटले.

तसेच अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचा सल्लाही त्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना दिला आहे. 

इस्लाम बदलणार नाही 

दरम्यान आलीया खान टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीला यासंबंधी मुलाखात दिली आहे.

या फतवा काढणाऱ्यांना आपल्या  भाषेत उत्तर देत गीता गायल्याने माझा इस्लाम बदलणार नाही, मला या स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याचे तिने सांगितले.