कुत्र्याच्या प्रेमापोटी बापाने मुलाविरोधात दाखल केला गुन्हा

अनेकांना घरात प्राणी पाळण्याची सवय असते. घराता पाळलेल्या प्राण्याची कालांतराने त्या कुटुंबाला इतकी सवय होते की तो प्राणी त्यांच्या घरातील महत्त्वाचा सदस्य होऊन जातो. या प्राण्यांच्या प्रेमापोटी मालक काहीही करण्यास तयार होतात. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 4, 2018, 11:11 AM IST
कुत्र्याच्या प्रेमापोटी बापाने मुलाविरोधात दाखल केला गुन्हा title=

भटगाव, रायपूर : अनेकांना घरात प्राणी पाळण्याची सवय असते. घराता पाळलेल्या प्राण्याची कालांतराने त्या कुटुंबाला इतकी सवय होते की तो प्राणी त्यांच्या घरातील महत्त्वाचा सदस्य होऊन जातो. या प्राण्यांच्या प्रेमापोटी मालक काहीही करण्यास तयार होतात. 

कुत्र्याच्या प्रेमापोटी एका बापाने आपल्या मुलाविरोधातच गुन्हा दाखल केल्याची घटना रायपूरमधील भटगांव येथे घडलीये. 

भटगाव ठाणे क्षेत्रात पोडी येथील शिवमंगल साय यांच्याघरीदेखील एक पाळीव कुत्रा होता. शिवमंगल हे या कुत्र्यावर पोटच्या मुलाप्रमाणे माया करत होते. 

मात्र बुधवारी संध्याकाळच्या सुमारास शिवमंगल यांच्या मुलाने कुत्र्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्याची हत्या केली. जेव्हा शिवमंगल घरी आले तेव्हा त्यांना घडलेला प्रकार पाहून संताप अनावर झाला. 

त्यांनी कुत्र्याचे शव घेत पोलीस ठाणे गाठले आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. भटगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला आणि शिवमंगल यांचा पुत्र संधारीविरोधात कलम ४२९ अंतर्गत गुन्हा दाखल केला.