डोनाल्ड ट्रम्पच्या ट्विटनंतर राहुल गांधींचा मोदींना 'हा' खोचक सल्ला

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी घर आहे. अशा आशयाचे ट्विट डोनाल्ड ट्र्म्प यांनी केले होते.

Updated: Oct 15, 2017, 06:56 PM IST
डोनाल्ड ट्रम्पच्या ट्विटनंतर राहुल गांधींचा मोदींना 'हा' खोचक सल्ला  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी घर आहे. अशा आशयाचे ट्विट डोनाल्ड ट्र्म्प यांनी केले होते.

मात्र अवघ्या काही दिवसांतच त्यांची भूमिका बदलली आहे. 

'पाकिस्तान तसेच तेथील नेत्यांसोबत संबंध सुधारत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी मदत केल्याबद्दल त्यांचे आभार !' असे ट्विट आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर राहुल गांधीही पुढे सरसावले आहेत. 
'मोदीजी घाई करा... डोनाल्ड ट्रम्पना पुन्हा आलिंगन द्या !' असा खोचक सल्ला राहुल गांधींनी मोदींना लगावला आहे. 

पाकिस्तान येथील सुरक्षा दलाने हक्कानी नेटवर्कच्या तावडीतून एका अमेरिकन कुटुंबाची सुटका केली त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली तेव्हा ‘भारत आमचा चांगला मित्र आहे’, असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. तसेच पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणावर अमेरिकेने टीकाही केली. यापूर्वी अमेरिकेने पाकिस्तानचा निषेध केला होता. पण ट्रम्पनी केलेल्या ट्विटमुळे मात्र अमेरिकेचा दुट्टपीपणा समोर आला आहे.