1 एप्रिलपासून तुमच्याशी निगडीत 'या' वस्तू महागणार

महागाई तुमचे खिसे कापण्याच्या तयारीत

Updated: Mar 31, 2021, 10:34 AM IST
1 एप्रिलपासून तुमच्याशी निगडीत 'या' वस्तू महागणार title=

नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत अनेक वस्तू महागणार आहेत. दूध, वीज आणि प्रवास सर्वकाही महाग होईल. आतापर्यंत केवळ कंपन्या महागाईन सहन करत होत्या. आता त्यांनी हा भार ग्राहकांच्या डोईवर दिलाय. महागाई कसे तुमचे खिसे कापण्याच्या तयारीत आहे, हे जाणून घेऊया

कार, ​​बाईक खरेदी महाग 

मारुती, निसानसारख्या कंपन्यांनी त्यांच्या कारची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून या कंपन्यांच्या कार महाग होतील. ही वाढ किती होणार याबाबत ऑटो कंपन्यांनी अद्याप खुलासा केलेला नाही. कार कंपन्यांचे म्हणणे आहे की, बर्‍याच दिवसांपासून त्यांना महागड्या कच्च्या मालाचा भार सोसावा लागला होता, पण आता त्यांनी हा भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

रेफ्रिजरेटर, एसी महाग

यावर्षी महागाईचा फटका एसी  ( air-conditioner- AC)किंवा फ्रीज खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे. 1 एप्रिलपासून एसी कंपन्या किंमती वाढविण्याच्या विचारात आहेत. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे कंपन्या एसीच्या किंमतीत वाढ करण्याची तयारी करत आहेत. एसीची प्रति युनिट किंमत 1500 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढू शकते.

1 एप्रिलपासून टीव्ही देखील महाग

1 एप्रिल 2021 पासून टीव्ही खरेदी करणे महाग होईल. गेल्या 8 महिन्यांत टीव्हीच्या किंमतीत 3 ते 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. टीव्ही उत्पादकांनीही पीएलआय योजनांमध्ये टीव्ही आणण्याची मागणी केली आहे. 1 एप्रिल 2021 पासून टीव्हीची किंमत कमीतकमी 2 ते 3 हजार रुपयांनी वाढेल.

हवाई प्रवास महाग

हवाई मार्गाने प्रवास करण्यासाठी आता आपल्याला अधिक खिसा खाली करावा लागणार आहे. देशांतर्गत उड्डाणांचे किमान भाडे 5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 1 एप्रिलपासून विमान वाहतूक सुरक्षा शुल्क (Aviation Security Fees) देखील वाढणार आहे. १ एप्रिलपासून देशांतर्गत उड्डाणांसाठी विमान वाहतूक सुरक्षा फी 200 रुपये असेल. सध्या ती 160 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी फी 5.2 डॉलरने वाढून 12 डॉलर इतकी असेल. नवीन दर 1 एप्रिल 2021 पासून लागू होतील.

दूध महागणार

दुधाची किंमत प्रति लिटर 3 रुपयांनी वाढवून 49 रुपये करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून दुधाचे नवीन दर लागू होतील. मात्र, दुधाची किंमत प्रति लिटर 55 रुपये करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. पण किंमत इतकी वाढणार नाही. 1 एप्रिलपासून तुम्हाला प्रतिलिटर दुध 49 रुपये मिळेल. अशा परिस्थितीत तूप, चीज आणि दहीसह सर्व दुधाच्या उत्पादनांची किंमत वाढू शकते.