रेल्वेत मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भारतीय रेल्वे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे करोडो प्रवास करणाऱ्या भारतीयांना फटका बसू शकतो

Updated: Mar 31, 2021, 09:40 AM IST
रेल्वेत मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत title=

 नवी दिल्ली  : भारतीय रेल्वे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे करोडो प्रवास करणाऱ्या भारतीयांना फटका बसू शकतो. रेल्वे प्रशासन निर्णय घेऊ शकते की, 'रात्रीच्या वेळी प्रवाशांना मोबाईल लॅपटॉप चार्जिंग करण्याची परवानगी नसेल'.  नुकत्याच काही ट्रेनला लागलेल्या आगीमुळे रेल्वे प्रशासन हे पाऊल उचलू शकते.

रात्री  मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग सुविधा बंद करण्याबाबत रेल्वे प्रशासनात गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. या निर्णयानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना चार्ज करण्यासाठी उपयोगात येणाऱे पॉईंट रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेऊ शकतात.
 
देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याला 13 मार्च रोजी आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.