PM Modi यांच्या ताफ्यात 12 कोटींची मर्सिडीज! काय आहेत या अलिशान गाडीची वैशिष्ट्य

 कशी आणि किती सुरक्षित आहे ही कार, काय आहे या गाडीचे फिचर्स, जाणून घ्या

Updated: Dec 28, 2021, 07:50 PM IST
PM Modi यांच्या ताफ्यात 12 कोटींची मर्सिडीज! काय आहेत या अलिशान गाडीची वैशिष्ट्य title=

Prime Minister Narendra Modi Car :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची भेट घेतली. दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस (Delhi Hyderabad House) इथं ही भेट झाली. पण यावेळी पंतप्रधान आपल्या नेहमीच्या गाडीत न दिसता नव्या कोऱ्या मर्सिडीज कारमधून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात नव्या गाडीचा समावेश झाला आहे. ही गाडी आहे मर्सिडीज मेबॅक S650 आर्मर्ड कार (Mercedes-Maybach S650 Guard). काय आहेत या गाडीची वैशिट्य, जाणून घेऊयात

सर्वात सुरक्षित कार
Mercedes-Maybach S650 गार्ड या गाडीला 10 दर्जाची सुरक्षितता देण्यात आली आहे. जे आतापर्यंत देण्यात आलेल्या गाड्यांमधलं सर्वोच्च संरक्षण आहे. मर्सिडीजने गेल्या वर्षी भारतात मेबॅक S600 गार्ड हे लाँच केलं होतं. ज्याची किंमत होती 10.5 कोटी रुपये. S650 हे मर्सिडिजचं लेटेस्ट मॉडेल असून याची किंमत 12 कोटींच्या घरात आहे. मर्सिडिजची ही सर्वात सुरक्षित गाडी मानली जाते. 

ट्विन-टर्बो V12 इंजिन
मर्सिडीज-मेबॅक S650 गार्ड गाडीला 6.0 लीटर ट्विन टर्बो V12 इंजिन देण्यात आलं आहे. कारचा टॉप स्पीड 160 किमी प्रतितास इतका  आहे. या गाडीच्या काचा आणि बॉडी बुलेट प्रूफ आहे. या गाडीला 2010 एक्सप्लोझिव्ह प्रूफ व्हेईकलाच दर्जा मिळाला आहे. म्हणजे गाडीपासून अवघ्या दोन मीटर अंतरावर जरी 15 किलो टीएनटी स्फोट (Safe from TNT Blast) झाला तरी गाडी सुरक्षित राहू शकते. गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीला कोणतीही इजा होणार नाही.

गाडीला भरभक्कम सुरक्षा कवच
गाडीच्या काचांचा आतील भाग हा पॉलिकार्बोनेट कोटिंगचा आहे. तर गाडीला खालच्या बाजूनेही भरभक्कम असं सुरक्षा कवच देण्यात आलं आहे. केवळ बॉम्ब आणि गोळीबारच नाही, तर गॅस अटॅक झाला तरीही गाडीच्या आतील व्यक्ती सुरक्षित राहू शकते. यासाठी गाडीच्या आतमध्ये वेगळ्या अशा एअर सप्लाय सिस्टीमची (Separate Air supply system) सुविधा देण्यात आली आहे.

विशिष्ट फ्युअल टँक
या गाडीच्या फ्युअल टँकवर एक विशिष्ट प्रकारचा कोट करण्यात आला आहे. गाडीवर हल्ला झाल्यानंतर क्षणार्धात तो आपोआप बंद होतो. यासाठी बोईंगच्या AH-64 अपाचे टँक हेलिकॉप्टर्स साठी वापरण्यात येणाऱ्या विशेष मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. तसंच या गाडीचे टायर्सही स्पेशल रन-फ्लॅट प्रकारचे (Special Run-flat tires) आहेत. या चाकांना अगदी बंदुकीच्या गोळ्या लागल्यानंतरही ते नेहमीप्रमाणेच काम करतात.

या गाडीचं आतलं इंटेरिअरही खास आहे. कारमध्ये मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी लेग रुम आणि सीट मसाजर अशा सुविधाही देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिनी ही कार महत्त्वाची आणि तितकीच सुरक्षित आहे.