पंतप्रधानांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा परिषद, महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक सुरू झाली आहे. 

Updated: Mar 3, 2019, 10:38 PM IST
पंतप्रधानांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा परिषद, महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती  title=

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 12 दिवसांनी 26 फेब्रुवारीला भारतातर्फे मोठी कारवाई करण्यात आली. भारतीय वायुसेनेने केवळ पीओकेतील दहशतवादी कॅंम्पच उद्धवस्त केले नाहीत तर बालाकोट येथील जैशचे मोठे कॅम्प देखील उद्धस्त केले. देशाविरुद्ध झालेला हल्ला सहन केला जाणार नाही असे भारत सरकारतर्फे सांगण्यात आले. जैश ए मोहम्मद या दहशतादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर ठार झाल्याचे वृत्त समोर आले होते. पण या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यात किंवा कर्करोगाने त्याचा मृत्यू झाला असावा अंदाज व्यक्त होत आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक सुरू झाली आहे. 

भारताविरुद्ध भ्याड हल्ला करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भारताच्या या कारवाई नंतर पाकिस्तानने स्वत:कडे ओढवून घेतले आणि भारतात विमानांची घुसखोरी करण्यास सुरूवात केली. त्याला भारतातर्फे जशास तसे उत्तर देण्यात आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. या बैठकीत अर्थ मंत्री, गृह मंत्री, सुरक्षा मंत्री, सुरक्षा सल्लागार उपस्थित आहेत. 
या दरम्यान हंडवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांना मोठे यश मिळाले आहे. आज झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेल्याचे सुरक्षा दलाकडून सांगण्यात येत आहे. यातील एक दहशतवादी लष्कर ए तोयबाचा असून दुसऱ्याची ओळख पटली नाही.