आलिशान गाड्यांसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

जीएसटी परिषदेच्या हैदराबादमध्ये पार पडलेल्या २१व्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मध्यम तसंच आलिशान आणि एसयूव्ही प्रकारात मोडणा-या कारसाठी आता जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. या गाड्यांवर 2 ते 7 टक्के सेस लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Sep 10, 2017, 10:22 AM IST
आलिशान गाड्यांसाठी मोजावे लागणार जास्त पैसे title=

हैदराबाद :जीएसटी परिषदेच्या हैदराबादमध्ये पार पडलेल्या २१व्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मध्यम तसंच आलिशान आणि एसयूव्ही प्रकारात मोडणा-या कारसाठी आता जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. या गाड्यांवर 2 ते 7 टक्के सेस लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयातून छोट्या आणि हायब्रीड कार वगळण्यात आल्या आहेत.याशिवाय सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी इडली, डोसासह दैनंदिन वापरांच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. आठ तासांच्या बैठकीनंतर अर्थमंत्री जेटली यांनी ही माहिती दिली आहे. आलिशान गाड्यांवरील सेस हटवल्याने राज्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे राज्य सरकारांकडून सेस वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.