नवीन वर्षाच्या आधीच सीमा हैदरने शेअर केली गूड न्यूज; सचिनच्या बाळाची होणार आई

Seema Haider Viral Video:  सीमा हैदर गरोदर असल्याचे वृत्त एका व्हायरल व्हिडीओद्वारे समोर आली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Dec 23, 2024, 04:44 PM IST
नवीन वर्षाच्या आधीच सीमा हैदरने शेअर केली गूड न्यूज; सचिनच्या बाळाची होणार आई title=
सीमा हैदर

Viral Video: नेपाळमार्गे चार मुलांना घेऊन भारतात आलेली पाकिस्तानची सीमा हैदर राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आली होती. भारतात राहणारा प्रियकर सचिनला भेटण्यासाठी ती आली. दरम्यान सचिन-सीमा या जोडीची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्यामागे कारणंही तसंच आहे. सीमा हैदर पुन्हा एकदा गरोदर असल्याची चर्चा आहे. सीमा हैदर गरोदर असल्याचे वृत्त एका व्हायरल व्हिडीओद्वारे समोर आली आहे.

सीमा हैदर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वैगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. तिचा सध्या अपलोड केलेला एक व्हिडीओ देशभरात चर्चेत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सीमा हैदर तिच्या गर्भधारणेच्या चाचणीचा निकाल दाखवताना दिसतेय. 

सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडा येथे राहणारा सचिन यांच्यात प्रेम झाले. पब्जी या ऑनलाइन गेमद्वारे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. आता सीमा हैदर सचिन आणि तिच्या चार मुलांसह ग्रेटर नोएडामध्ये राहतात. पण आता सीमाने दिलेली न्यूज खरी मानली तर पुढच्या काळात त्यांच्या घरी नवा पाहूणा येऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी सचिन-सीमाच्या घरात आनंदाची लाट पसरली आहे.

मला मळमळ आणि चक्कर येत आहे, असे सीमा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते. यानंतर तिने गर्भधारणा चाचणी केली. चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आलेला दिसतो. यानंतर ती सचिनला रूममध्ये बोलावते आणि त्याला सरप्राईज देते सांगत त्याच्या हातात प्रेग्नेन्सी कीट ठेवते. सचिनने हात उघडल्यावर तो गर्भधारणा चाचणी किट पाहतो आणि आनंदाने ओरडतो. काही क्षणांनंतर तो सीमा हैदरला मिठी मारतो आणि किटला त्याच्या छातीशी घेतो.

सीमा आणि सचिनची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सीमाने नेपाळमार्गे आपल्या चार मुलांसह भारतात अवैधरित्या प्रवेश केला होता. सीमा आणि सचिनची भेट पब्जी गेम खेळताना झाली. सचिनसोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न घेऊन ती भारतात आली. तिने पाकिस्तानातील घरही विकले होते.

नेपाळमार्गे भारतात आलेली सीमा ग्रेटर नोएडातील रबुपुरा गावात सचिनसोबत आनंदी जीवन जगत आहे. ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी केली होती, मात्र या प्रकरणात शिक्षेची तरतूद नसल्याने पासपोर्ट कायद्यातील 3,4,5 ही कलमेही काढून टाकण्यात आली होती.