ट्रिपल तलाक विधेयकाला कॅबिनेटकडून मंजूरी

मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक म्हणजे ट्रिपल तलाक विधेयक शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आलं. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 15, 2017, 04:13 PM IST
ट्रिपल तलाक विधेयकाला कॅबिनेटकडून मंजूरी  title=

नवी दिल्ली : मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक म्हणजे ट्रिपल तलाक विधेयक शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आलं. 

सरकार या बिलाला संसदेत सादर करणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे विधेयक संसदेतील शीतकालीन सत्रातील सरकारचा मुख्य अजेंडा आहे. तीन तलाकाच्या प्रस्तावात एका कायद्याच्या मसुद्यात असं सांगितलं आहे की, तीन तलाक चुकीचे आहे. असं करणाऱ्या व्यक्तीला ३ वर्षाची शिक्षा होऊ शखते. 

काय आहे या विधेयकात?

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समूहाद्वारे चर्चा करून हे बिल पास करण्यात आले आहे. या विधेयकाच्या ड्राफ्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, दोषिंना ३ वर्षाची शिक्षा आणि दंड लावण्यात येणार आहे. हा एक अपराध समजला जाणार आहे. 

तसेच यामध्ये पीडित महिलेला भत्ता आणि नाबालिक मुलं असल्यास त्यांची कस्टडी द्यावी याचा समावेश करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने देखील केंद्राला मंजूरी दिली आहे. यांच्यानुसार कोणत्याही पद्धतीची तीन तलाक म्हणजे बोलून, लिहून आणि ईमेल, एसएमएस आणि व्हाट्सअॅपसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ट्रिपल तलाक चुकीचे आहे.