मोदी सरकारची नवी योजना ; गृहिणींना घरबसल्या मिळणार काम

मोदी सरकार एका नव्या स्किमवर काम करत आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 15, 2017, 03:46 PM IST
मोदी सरकारची नवी योजना ; गृहिणींना घरबसल्या मिळणार काम title=

नवी दिल्ली : मोदी सरकार एका नव्या स्किमवर काम करत आहे. या योजनेचा सर्वात अधिक फायदा गृहिणींना होणार आहे. या स्किमअंतर्गत गृहिणी घरबसल्या देखील बीपीओसाठी काम करू शकतात. यामुळे त्यांचे ग्रुमिंग तर होईलच पण त्याचबरोबर त्यांना चांगला फायदादेखील होईल. लवकरच सरकार ही योजना अंमलात आणणार आहे. या योजनेअंतर्गत जवळपास १०० महिलांना घरबसल्या बिजनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) काम करून चांगला उत्पन्न मिळवू शकतात. 

ही आहे सरकारची योजना

इन्फॉरमेशन अॅन्ड टेक्नोलॉजी मिनिस्‍टर रवि शंकर प्रसाद यांनी आपल्या विभागाला गृहिणींसाठी एक योजना बनवण्यास सांगितले. यात सुमारे १०० महिलांनी एकत्र येऊन एक प्लॅटफॉर्म तयार करा आणि मिळून काम करावे. ही माहिती त्यांनी बीपीओ प्रमोशन स्‍कीमच्या एका कार्यक्रमात दिली. 

काय आहे ही योजना  ?

देशात इन्फारमेशन अॅण्ड टेक्नोलॉजी (IT) सेक्टरचा विकास फक्त ठराविक शहरात झाला आहे. अधिकतर आयटी कंपन्या दिल्ली-नोएडा-गुरुग्राम, मुंबई-पुणे, हैदराबाद, बंगळूर-म्हैसूर आणि चेन्नईत आहेत. हे पाहता सरकारने २०१४ मध्ये छोट्या शहरात आयटी सेक्टरच्या नोकऱ्यांची संधी वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याचप्रमाणे सरकारने बीपीओ प्रमोशन स्‍कीमला सुरूवात केली आहे. 

सरकार देणार १ लाख रूपये

या योजनेअंतर्गत एका जागेसाठी एक लाख रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसंच अपंग, तरूण आणि महिलांना रोजगार देण्याचा उद्देश या योजनेत आहे.

बीपीओ प्रमोशन स्कीमच्या अंतर्गत ४८,३०० जागा आणि पूर्वोत्तर बीपीओ प्रोत्साहन योजनेअंतर्गत ५००० जागा भरण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

आतापर्यंत ८७ कंपन्यांनी १८,१६० सीट अलॉटदेखील झाले आहेत. या सीट १९ राज्यातील आणि संघ शासित प्रदेशातील ६० जागी आहेत. 

या शहरात आहेत संधी

बरेली

वाराणसी

तिरुपति

गुंटुपल्ली, 

राजमुंदरी

पटना  मुजफ्फरपुर

यपुर

बद्दी, शिमला

भुवनेश्वर

जलेश्वर

कोट्टाकुप्पम, मदुराई, मइलादुथुरई, तिरुचिरापल्ली, तिरुप्पटूर आणि वेल्लोर,

रीमनगर, भदेरवाह, बडगाम, जम्मू, सोपोर और श्रीनगर 

औरंगाबाद, भिवंडी, सांगली, वर्धा

गुवाहाटी, जोरहाट, कोहिमा, इंफाळ

कुठे सुरू होतील बीपीओ ?

मथुरा, बेतालपुर (देवरिया), फर्रुखाबाद, जहानाबाद, गया, चित्तूर, दलसिंहसराय, पठानकोट, अमृतसर, ग्वालियर, रायसेन, श्रृंगेरी, उडुपी, हुबली, बालासोर, कटक, पुरी, रांची, देवघर, वेल्लोर, तिरुपुर मध्ये बीपीओ सुरू केले जातील. पुर्वेकडे आसामच्या दीफू, मजूली, कोकराझार आणि सिलचर, दीमापुर (नागालैंड) आणि अगरतला (त्रिपुरा) येथे बीपीओ सुरू होतील.

बीपीओतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा

बीपीओतर्फे ग्राहकांना 24*7 सेवा दिली जाते. यात बीपीओचे कर्मचारी ग्राहकांच्या शंकेचे निरसन करतात. नवीन स्किमची माहिती देतात. त्याचबरोबर टेक्निकल सपोर्ट सर्व्हिस दिली जाते.