Video : भररस्त्यात लेक आणि सुनेला सासूने चोपलं, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का...

Mother Viral Video : भररस्त्यात दिवसाढवळ्या पोलिसांसमोर आईने आपल्या मुलाला आणि सुनेला दे दणादण हाणलं. बघ्यांनी एकच गर्दी केली. नेमकं काय झालं तरी काय...आईच्या संतापाचं कारण ऐकून तुम्ही पण डोक्याला हात मारून घ्याल. 

नेहा चौधरी | Updated: May 14, 2023, 12:23 PM IST
Video : भररस्त्यात लेक आणि सुनेला सासूने चोपलं, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का... title=
Mother best son and daughter in law on road for not wearing helmet Viral Video on Social media trend on google now

Mother best son and daughter in law Viral Video : सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आज मदर्स डे म्हणजे मातृदिन...या मातृदिनीच एका आईने आपल्या मुलगा आणि सुनेला भर रस्त्यात मारलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर मारमारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. महिला आणि मुलींमधील मारामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्ह्यूज असतात. (trending video)

देशी आईचा देशी अंदाज!

या व्हिडीओमधील आईला एवढं संतापायला काय झालं आहे. हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. आईचा हा देसी अवतार पाहून नेटकरी चक्रावून गेले आहेत. झालं असं की, एका बाईकवर मुलगा आणि सूने कुठेतरी जायला निघाले. जशी मुलांने बाईक सुरु केली आई मुलाच्या मागे धावत आली आणि मुलगा - सुनेला मारायला लागली. भररस्त्यात आणि दिवसाढवळ्या अगदी पोलिसांसमोर ती त्यांना मारत होती. पोलीसही आईचा हा रौद्ररुप पाहून हैराण झाले होते. (Mother best son and daughter in law on road for not wearing helmet Viral Video on Social media trend on google now )

कारण जाणून बसेल धक्का!

तुम्ही पण म्हणाल एवढं झालं तरी काय, खरं तर आईला एवढा संताप का झालं याचं कारण ऐकून तुम्हालाही तुचं कौतुकचं वाटेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. मुलगा आणि सून बाईकने जात असताना मुलाने हेल्मेट घातलं नव्हतं. त्यात सूनेने हेल्मेट डोक्यात ऐवजी हात धरलं होतं. त्यामुळे ही आई संतापली होती. बघितलं मुलगा चुकला की आई मुलाला शिस्त लावण्यासाठी रौद्ररुप पण घेते.  

आईच्या या चिडण्यामागे पोरांची काळजी होती. हेल्मेट सक्ती असून जर हेल्मेट नसेल तर जीवावर बेत हे आईला माहिती आहे. या भीतीपोटी तिने मुलगा आणि सुनेला मारलं. या मारहाणीमागे तिचं प्रेम आणि काळजी लपली होती. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून या देशी आईला सलाम करत आहेत. या व्हिडीओला काही वेळात भरपूर लाईक्स आणि रिट्विटसह मिळतं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवरील Maya Sharma या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या मातेचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.