आजच्या युगात सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्यावर लोक रातोरात स्टार बनत आहेत. लोकप्रिय होण्यासाठी सोशल मीडिया स्टार (Social Media Star) त्यांचे व्हिडिओ बनवतात आणि शेअर करतात. यामध्ये काही व्हिडिओ यूजर्सना इतके आवडतात की ते व्हायरल होतात. अशाच एका डान्सचा एक मजेदार व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण जिममध्ये (GYM) ट्रेडमिलवर (treadmill) 'बोले चुडियाँ...' (bole chudiyan) गाण्यावर नाचताना दिसत आहे. (man sizzling dance on the treadmill in the gym)
इंस्टाग्रामवर (instagram) शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, हा तरुण जिममध्ये ट्रेडमिलवर (treadmill) 'बोले चुडियाँ...' या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसत आहे. ट्रेडमिलवर या गाण्याच्या सगळ्या थक्क करणाऱ्या स्टेप्स तरुणाने केल्या आहेत. मात्र, ट्रेडमिलवर नाचणे धोकादायक असू शकते.
अनेक युजर्सनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडिओ आलोक शर्मा नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या खात्याला एक लाखाहून अधिक लोक फॉलो करत आहेत. व्हिडिओमध्ये ट्रेडमिलवर डान्स करताना त्या व्यक्तीने ज्या पद्धतीने आपला तोल सांभाळला आहे तो थक्क करणारा आहे. ट्रेडमिलवर असा डान्स करणं धोकादायक असू शकतं. पण तरीही या तरुणाने आपला तोल सांभाळत जबरदस्त असा डान्स केलाय.