मेट्रोत भरगर्दीत तरुणाचे हस्तमैथून, अल्पवयीन मुलीवर...; घृणास्पद प्रकार समोर

Masturbation in Delhi Metro Train: दिल्लीतील मेट्रोत पुन्हा एकदा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. मेट्रोत एका व्यक्तीने हस्तमैथून केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 31, 2023, 04:33 PM IST
मेट्रोत भरगर्दीत तरुणाचे हस्तमैथून, अल्पवयीन मुलीवर...; घृणास्पद प्रकार समोर title=
Man Masturbates Ejaculates on Minor Girl in delhi Metro

Delhi Metro News: दिल्ली मेट्रो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मेट्रोत तरुणांकडून करण्यात येणारी अश्लील कृत्ये किंवा मेट्रोतील डान्स याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) पवित्र सणाच्या दिवशीच एक धक्कादायक प्रकार मेट्रोत घडला आहे. रक्षाबंधनाचा सण असल्याने रात्री मेट्रोत खूप गर्दी होती. अशातच गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने घृणास्पद कृत्य केले आहे. (Delhi Metro News Update)

बुधवारी रक्षाबंधन असल्याने अनेक जण घराबाहेर पडत होते. मेट्रोलाही नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. रेड लाइन मेट्रो मार्गावरील मेट्रोत रात्री साधारण 8 वाजून 30 मिनिटांनी एक व्यक्ती हस्तमैथून करत असल्याची उघडकीस आले आहे. एका महिलेच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गर्दीचा फायदा घेत मेट्रोच्या डब्यातच अश्लील कृत्य करत होता. त्याचवेळी एका अल्पवयीन मुलीच्या अंगावर स्पर्म पडल्यानंतर तिच्या आईला याबाबत कळलं. हा भयानक प्रकार पाहून दोघीही घाबरल्या होत्या. तो पर्यंत मेट्रो सीलमपूर स्थानकात पोहोचली होती. मुलीच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर प्रवाशांनी त्याला पळून जाणाऱ्या आरोपीला पकडले व शहादरा स्टेशनवर दिल्ली मेट्रो अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं आहे. 

आरोपी हा मुळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलिस ठाण्यात हजर केले आहे. मात्र, भरगर्दीत व प्रवाशांसमोर असा प्रकार घडल्याने एकच खळबळ पसरली आहे. 

महिलेला अश्लील इशारे

यापूर्वी 10 ऑगस्ट रोजीदेखील दिल्लीत अशीच एक घटना घडली होती. दिल्लीतील मंडी हाऊस मेट्रो स्टेशनवर महिलेला अश्लील इशारे करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होती. त्यानंतर 23 वर्षांच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव शिवम शर्मा असे असून त्याने बी. फार्मा केले आहे. तो एका कंपनीत मार्केटिंग पदावर कार्यरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला तुगलकाबाद मेट्रो स्टेशन ते मंडी हाऊस मेट्रो स्टेशनला जात होती. महिला मंडी हाऊस स्टेशनवर उतरली व प्लॅटफॉर्मवर आपल्या मित्राची वाट पाहत थांबली होती. त्याचवेळी पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या आरोपीने अश्लील इशारे करण्यास सुरुवात केली. 

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला इतकी घाबरली होती की तिने स्टेशनवर असलेल्या CISF कर्मचाऱ्याशी संपर्क केला. मात्र, अधिकारी तेथे पोहोचेपर्यंत तो तिथून पळून गेला होता.