नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी एक विधान केलंय, पण या विधानाच्या माध्यमातून त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर निशाणा देखील साधला आहे.
अमित शहा यांना लक्ष करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘पक्षाचा अध्यक्ष केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतो. ही हुकूमशाहीच आहे, पक्षाचा अध्यक्ष मंत्र्यांची बैठक कशी घेऊ शकतो?, पंतप्रधान कोण आहे?, मोदी की अमित शहा? असा सवालच त्यांनी उपस्थित केला.
एका स्थानिक वृत्त वाहिनीवर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'मी मोदींचे समर्थन करते, पण अमित शहांना माझा विरोध आहे, मी पंतप्रधानांना जबाबदार ठरवत नाही. मी त्यांना का जबाबदार ठरवावं?, पण त्यांच्या पक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे', ' देशात हुकूमशाहीचे वातावरण असून एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरकारी कामात हस्तक्षेप करत आहेत' असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांचं नाव न घेता केलां आहे.
यावेळी ममता बॅनर्जींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे कौतुक करायला विसरल्या नाहीत. 'वाजपेयीदेखील भाजपचे नेते होते. पण ते संतुलित आणि निष्पक्ष नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला कधीच अडचणींचा सामना करावा लागला नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं. विद्यमान सरकारमधील समस्यांसाठी ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदीं यांच्या ऐवजी भाजपला जबाबदार ठरवले.
अमित शहा यांना लक्ष करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘पक्षाचा अध्यक्ष केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतो. ही हुकूमशाहीच आहे, पक्षाचा अध्यक्ष मंत्र्यांची बैठक कशी घेऊ शकतो. पंतप्रधान कोण आहे?, मोदी की शहा असा सवालच त्यांनी उपस्थित केला. ममता बॅनर्जींनी मोदींचे धोरण स्वीकारल्याचे संकेत दिले असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर मोदींचे समर्थन केल्याने विरोधकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
‘विरोधी पक्षांमध्ये आता एकजूट झाली असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात बदल होईल. ६ महिन्यांसाठी प्रतीक्षा करा, सर्व चित्र स्पष्ट होईल’ असेही बॅनर्जींनी म्हटले आहे. केंद्र सरकारवर कोणी टीका केल्यास ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचे पथक त्यांच्या घरात पोहोचते, असा आरोप देखील यावेळी ममता बॅनर्जी यांनी केला.