Maharashtra Karnataka Border : महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या, सीमेवर धुमाकूळ

कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी (kannada vedike) बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर तुफान दगडफेक केली.  महाराष्ट्राच्या गाड्यांच्या या माजुरड्या कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या. 

Updated: Dec 6, 2022, 10:58 PM IST
Maharashtra Karnataka Border : महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या, सीमेवर धुमाकूळ title=

मुंबई :  दहशत निर्माण करणाऱ्यांसाठी कन्नडिगांनी पुन्हा बेळगावात (Belgam) धुमाकूळ घातला. थेट महाराष्ट्रातल्या (Maharashtra) गाड्याच बेळगावात फोडण्यात आल्या. कन्नडिगांच्या या धुमाकूळानंतर बेळगाव सीमावादाचा () प्रश्न आता दिल्लीदरबारी पोहचलाय. पाहुयात एक रिपोर्ट. आपल्या कुरापतींनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात (Maharashtra Karnataka Border Dispute) तेल ओतणा-या कन्नडिगांची मस्ती पुन्हा एकदा दिसली. कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी (kannada vedike) बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर तुफान दगडफेक केली.  महाराष्ट्राच्या गाड्यांच्या या माजुरड्या कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या. गाड्यांना काळं फासलं आणि चिथावणीखोर घोषणा दिल्या. दहशत निर्माण करण्यासाठी कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला.  (maharashtra karnataka border dispute kannada vedike followers stone pelting storm at hirebagewadi toll booth in belgaum)

त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय. पुण्यात या धुडगूसविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. स्वारगेट बसस्थानकात कर्नाटकच्या बसेसना आंदोलकांनी काळं फासलं. त्यामुळे राजकीय वातावरणही तापलं. सीमावादावरून पवारांनी थेट केंद्र सरकारला लक्ष्य केलं. केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका शरद पवारांनी केली. इतकंच नाही तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी मागणीही पवारांनी केली.

पवारांच्या मागणीनंतर संसदीय अधिवेशनाच्या पूर्वसंधेला बोलावलेल्या दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीत बेळगावचा मुद्दा आला. सीमाप्रश्नावर समिती स्थापन करुन तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी शिंदे गटाच्या खासदारांनी केली. तर पंतप्रधान मोदींनी या प्रश्नात लक्ष घालण्याचा आग्रहच राज्य सरकारनं केलाय.

काही दिवसांपासून कर्नाटककडून महाराष्ट्राला चिथावणी दिली जातेय. महाराष्ट्रातल्या गावांना कर्नाटकात सामील होण्याचं गाजर दाखवणं, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धमकीवजा ट्विट करणं आणि आता तर कन्नडीगांनी मराठी भाषकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी रस्त्यावर उतरुन धुमाकूळ घातलाय. त्यामुळे हा वाद आणखीन पेटण्याची शक्यता आहे.