LPG Stove : या शेगडीचा वापर कराल तर, 10 टक्केपेक्षा जास्त गॅसची होईल बचत

एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमध्ये सर्वसामांन्याचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोलिएम क्षेत्रातील महारत्न कंपनी BPCL ने विशेष शेगडी (Stove)निर्माण केला आहे.

Updated: Jul 9, 2021, 02:24 PM IST
LPG Stove : या शेगडीचा वापर कराल तर, 10 टक्केपेक्षा जास्त गॅसची होईल बचत title=

मुंबई : एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमध्ये सर्वसामांन्याचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोलिएम क्षेत्रातील महारत्न कंपनी BPCL ने विशेष शेगडी (Stove)निर्माण केला आहे. ज्यामध्ये गॅस कमी खर्च होईल. या शेगडीची फ्लेम कमी असते. परंतु तेवढ्याच प्रमाणात उष्णता निर्माण करते. नवीन शेगडीचे हेच वैशिष्ट आहे की, गॅस कमी खर्च होईल परंतु हिट तेवढीच निर्माण होईल. यामुळे LPG खर्च होण्याच्या प्रमाणात 10 टक्क्यांनी घट होईल.

BPCL ने निर्माण केलेली ही शेगडी देशातील सर्व घरांमध्ये उपलब्ध करून दिल्यास, वर्षाला 17 लाख टन LPGची बचत होऊ शकते. LPG ची सध्याची किंमतीप्रमाणे 7000 कोटी रुपयांच्या विदेशी चलनाचीही बचत होऊ  शकेन.

या शेगडीला BPCLच्या वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची चोरी होऊ नये म्हणून त्यांनी भारतीय पेटंट कार्यालयात 4 पेटंट आणि 4 डिझाईनची नोंदणी केली आहे.

कुठे मिळेल ही शेगडी
बीपीसीएलच्या LPG डीलरकडे ही शेगडी मिळेल. सध्या कमर्शिअल विक्रीसाठी बाजारात ही शेगडी उपलब्ध नाही.