महागाईचा आणखी भडका, पेट्रोल-डिझेलनंतर आता LPG सिलिंडरची किंमत वाढणार

 LPG Price Hike:  महागाईचा भडका होत असताना आता LPG सिलिंडरची भर पडणार आहे.  

Updated: Oct 28, 2021, 09:14 AM IST
महागाईचा आणखी भडका, पेट्रोल-डिझेलनंतर आता LPG सिलिंडरची किंमत वाढणार title=
संग्रहित छाया

मुंबई : LPG Price Hike:  महागाईचा भडका होत असताना आता LPG सिलिंडरची भर पडणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका बसू शकतो. LPG सिलिंडरच्या किमती (LPG Price Hike) पुढील आठवड्यात पुन्हा वाढवल्या जाऊ शकतात. वास्तविक, एलपीजीच्या विक्रीतील तोटा वाढून 100 रुपये प्रति सिलिंडर झाला आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

पीटीआयच्या वृत्तानुसार, सूत्रांचे म्हणणे आहे की, किमतींमध्ये किती वाढ होणार आहे, हे सरकारच्या मान्यतेवर अवलंबून आहे. याला सरकारची मंजुरी मिळाल्यास सर्व श्रेणींमध्ये वाढ होईल. यामध्ये घरगुती वापरासाठी अनुदानित गॅस, विनाअनुदानित गॅस आणि व्यवसायिक गॅसचा समावेश आहे.

6 ऑक्टोबर रोजी किमती वाढल्या होत्या

याआधी 6 ऑक्टोबर रोजी एलपीजीच्या दरात 15 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. याआधी जुलैनंतर एलपीजीच्या किमतीत एकूण वाढ 90 रुपये प्रति सिलिंडरवर पोहोचली होती. पीटीआयच्या अहवालानुसार, सरकारी तेल विपणन कंपन्यांना विक्रेत्याच्या किंमतीत तफावत दूर करण्याची परवानगी दिलेली नाही आणि हे अंतर भरून काढण्यासाठी अद्याप कोणतेही सरकारी अनुदान मंजूर केलेले नाही.

दर सातत्याने का वाढत आहेत?

एलपीजीच्या विक्रीतील तोटा सातत्याने वाढत आहे. सध्या हा तोटा प्रति सिलिंडर 100 रुपयांहून अधिक झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऊर्जेच्या किमती वाढत आहेत. कच्च तेलही वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर आहे. सौदी अरेबियामध्ये एलपीजीच्या किमती या महिन्यात 60 टक्क्यांहून अधिक वाढून  800 प्रति डॉलर टनवर पोहोचल्या आहेत.

सरकारला भरपाई द्यावी लागेल

सध्या आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 85.42 डॉलर वर व्यवहार करत आहे. अहवालानुसार, एका सूत्राने सांगितले की एलपीजी अजूनही नियंत्रित वस्तू आहे. त्यामुळे, तांत्रिक कारणास्तव, सरकार किरकोळ विक्रेत्याच्या किमतींचे नियमन करू शकते. परंतु, जेव्हा ते करतात, तेव्हा तेल कंपन्यांना कमी दराने एलपीजी विकून कमी-वसुली किंवा तोटा भरून काढावा लागेल.