पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर सोशल मीडियात मिम्सचा धुमाकूळ

लॉकडाऊन ४ मध्ये काहीतरी टास्क मिळावा अशी काहींची इच्छा होती. 

Updated: May 13, 2020, 07:34 AM IST
पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर सोशल मीडियात मिम्सचा धुमाकूळ title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत 'लॉकडाऊन ४' चे संकेत दिले. मंगळवारी रात्री ८ वाजता त्यांनी देशाल संबोधित केले. यावेळी पंतप्रधान देशाला काही टास्क देतील अशी काहींची इच्छा होती. पण तसे न झाल्याने सोशल मीडियात मिम्स शेअर करत नाराजी व्यक्त करण्यात आली. कोरोना वॉरियर्सचे आभार मानण्यासाठी पंतप्रधानांनी घराच्या खिडकीजवळ येऊन थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर घरातील लाईट बंद करुन दिवे लावण्याचे आवाहन केले होते. दरम्यान देशातील तिन्ही दलाने रुग्णालयांवर पुष्पवृष्टी केली होती. या सर्व पार्श्वभुमीवर लॉकडाऊन ४ मध्ये काहीतरी टास्क मिळावा अशी काहींची इच्छा होती. ती पूर्ण न झाल्याने त्यांनी सोशल मीडियात मिम्स शेअर केले आहेत. 

तिसरा लॉकडाऊन १७ मेला संपत आहे. याआधी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा होईल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

कोरोनाचे संकट सरल्यानंतर भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तब्बल २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली.

'पंतप्रधानांना ठोस सांगायचं नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचे?'

या पॅकेजच्या माध्यमातून देशाच्या जीडीपीच्या १० टक्के आर्थिक मदत केली जाईल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था, मजूर, लघूमध्यम उद्योग अशा सर्वांना मदत केली जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याबद्दल सविस्तर माहिती देतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

भारताने कोरोनाच्या संकटाचे संधीत रुपांतर करायला पाहिजे. तरच २१ व्या शतकावर वर्चस्व ठेवण्याचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यासाठी भारताला स्वयंपूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे भारताने एखादी गोष्ट ठरवली तर काहीच अवघड नाही.

आगामी काळात आपल्याला अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, सक्षम व्यवस्था, वैविध्यपूर्ण लोकसंख्याशास्त्र (डेमोग्राफी) आणि मागणी पुरवठ्याच्या चक्राचे सुयोग्य नियोजन या पाच प्रमुख घटकांच्या पायावर देशाची भक्कम इमारत उभारावी लागेल, असे मोदींनी यावेळी सांगितले.

त्यासाठी देशातील जनतेने आपला मोर्चा 'ग्लोबल'कडून लोकल उत्पादनांकडे वळवाला. स्थानिक उत्पादनांची केवळ खरेदीच नव्हे तर त्यांचा प्रचारही करा.

जेणेकरून स्थानिक उत्पादनांना सुगीचे दिवस येतील, असेही मोदींनी यावेळी म्हटले.

दरम्यान सोशल मीडियातील मिम्स चर्चेचा विषय बनत आहेत.