गर्लफ्रेन्डला घरी बोलवलं, केक कापला अन्... प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक

Karnataka Crime News : बंगळुरूमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली आहे.

Updated: Apr 15, 2023, 03:22 PM IST
गर्लफ्रेन्डला घरी बोलवलं, केक कापला अन्... प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक title=

Crime News : कर्नाटकच्या (Karnataka News) बंगळुरुमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. प्रेयसीचा वाढदिवस (Birthday) साजरा केल्यानंतर प्रियकराने तिची निर्घृणपणे हत्या (Karnataka Crime) केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर बंगळुरुमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बंगळुरु पोलिसांनी (Bengaluru Police) या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. प्रेयसीवर असलेल्या संशयातून प्रियकराने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी बंगळुरूमध्ये प्रेयसीचा वाढदिवस एकत्र साजरा केल्यानंतर काही मिनिटांतच प्रियकराने तिचा गळा चिरला.

बंगळुरुच्या लगेरे भागात हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या माथेफिरू प्रियकराने आपल्याच 26 वर्षीय प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काही वेळाने चाकूने गळा चिरून तिची हत्या केली. आरोपी प्रियकराला त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबतही अफेअर असल्याचा संशय होता. त्याच रागातून त्याने प्रेयसीची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली आहे.

प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत अफेअर असल्याचा संशय प्रियकराला होता. त्यामुळे त्याने प्रेयसीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर तिचा गळा चिरला आणि तिला संपवून टाकलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय मृत प्रेयसी पोलीस खात्यात कारकून होती. कनकपूर येथील प्रशांत नावाच्या तरुणासोबत तिचे गेल्या 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही नात्यात एकमेकांचे भाऊ-बहिण लागत होते. प्रेयसीने मंगळवारी तिचा वाढदिवस साजरा केला होता. पण प्रशांत व्यस्त असल्याचे सांगून तो तिथे गेला नाही.

त्यानंतर आरोपी प्रशांतने शुक्रवारी रात्री पुन्हा तिचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. यासाठी त्याने केकदेखील आणला होता. तसेच प्रशांतने संपूर्ण खोली छान सजवली होती. प्रशांतच्या घरी प्रेयसीने केक कापला. त्यानंतर प्रशांतने स्वयंपाकघरातून चाकू आणून प्रेयसीचा गळा चिरून खून केला. खून केल्यानंतर प्रशांत तेथून पळून गेला. दुसरीकडे, मुलगी घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र ती न सापडल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास केला असता मुलीचे शेवटचे लोकेशन प्रशांतच्या घरी सापडले.

पोलिसांनी तात्काळ प्रशांतच्या घरी धाव घेतली. प्रशांतच्या घरी पोहोचताच पोलिसांना धक्काच बसला. मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी पाहिले. घरात मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. पोलिसांनी तात्काळ मृतदेह विक्टोरिया रुग्णालयात पाठवून दिला. त्यानंतर पोलिसांनी प्रशांतकडे तपास वळवला. कसून तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रशांतला अटक करत त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आता पुढील तपास सुरु केला आहे.

हत्येचे कारण आले समोर

आरोपी प्रशांतने पोलिसांना सांगितले की तो चिडला होता. "मला प्रेयसीवर संशय होता कारण ती दुसऱ्या व्यक्तीशी चॅटिंग करत होती. यावरून आमच्या दोघांमध्ये अनेकदा भांडण देखी झाले होते. मात्र राग अनावर झाल्याने मी तिची हत्या केली," असे प्रशांतने सांगितले.