कर्नाटकात कोण सरकार स्थापणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पाहा

Karnataka Election 2023: कर्नाटकात सध्या भाजप सत्तेवर आहे. दक्षिण भारतात कर्नाटक हे एकमेव राज्य भाजपकडे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थीतीत या राज्यात सत्ता कायम राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.

Updated: May 2, 2023, 04:17 PM IST
कर्नाटकात कोण सरकार स्थापणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पाहा  title=

Karnataka Election 2023 Opinion Poll:  कर्नाटक विधानसभेसाठी  येत्या 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्याआधी Zee News साठी MATRIZE ने केलेल्या ओपिनियन पोलचे (Opinion Poll) आकडे समोर आले आहेत. हा ओपिनियन पोल 29 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान करण्यात आला आहे. कर्नाटक विधानसभेच्या (Karnatak Election) 224 जागांसाठी 2 लाख 80 हजार नागरिकांचं मत नोंदवण्यात आलं आहे. हा ओपिनियन पोल म्हणजे कोणत्याही प्रकारे निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही.

कर्नाटकात सध्या भाजपची (BJP) सत्ता आहे. तर काँग्रेस (Congress) विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. दक्षिण भारतात कर्नाटक हे एकमेव राज्य भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकवर सत्ता कायम राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. Zee News MATRIZE च्या ओपिनियन पोलमध्ये जाणून घेऊन कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्यात.

ओपिनिअन पोलच्या आकडेवारीनुसार कर्नाटकमध्ये भाजपाला 103 ते 115 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 79-91 जागांवर समाधान मानावं लागेल. पण जेडीएस कर्नाटकमध्ये किंगमेकरची भूमिका पार पाडू शकतं. त्यांच्या खात्यात 26 ते 36 जागा मिळू शकतात. म्हणजेच कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन्यासाठी जेडीएसची मदत घ्यावी लागणार. तर इतर पक्षांना 1-3 जागा मिळू शकतील.

मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती?
ओपिनिअन पोलमध्ये कर्नाटकात मुख्यमंत्री म्हणून लोकांची पसंती कोणाला आहे हे देखील जाणून घेतलं. यात 24 टक्के लोकांनी सिद्दरमैया यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी  पसंती दर्शवली आहे. तर सर्वाधिक म्हणजे 28 टक्के मदत सध्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पसंती दिली आहे. 11 टक्के लोकांनी जेडीएस नेते एच डी कुमारस्वामी यांनी पसंती दिली आहे. तर काँग्रेसच्या के डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून 14 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. 23 टक्के लोकांनी इतर नेत्यांची नावं सुचवली आहेत. 

6 विभागात विभागणी
कर्नाटकात 224 विधानसभा जागा आहेत. भौगलिक परिस्थिती पाहिली तर कर्नाटक हे सहा विभागात विभागलं गेलं आहे. प्रत्येक विभागात वेगवेगळा मतदार वर्ग आहे. अनेक विभागात विशिष्ट जाती आणि समुदायांचं वर्चस्व आहे. जो भाग आंध्र सीमेला जोडला जातो, तो हैदराबाद-कर्नाटक म्हणून ओळखला जातो. तर महाराष्ट्राला जोडला गेलेल्या भागाला मुंबई-कर्नाटक म्हणून ओळखलं जातं. 

हैदराबाद-कर्नाटक भागात 40 विधानसभा जागा आहेत. तर मुंबई-कर्नाटकात 44 विधानसभा जागा येतात. जुनं मैसूर भागात 66, समुद्र किनारी क्षेत्रात 18, बंगळुरुमध्ये 28, तर मध्य कर्नाटकात 27 जागा आहेत.