अल्लाला खूश करण्यासाठी मुलीची कुर्बानी

प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या नवाब अलीकडे पोलिसांनी सखोल चौकशी करताच त्याने आपणच आपल्या मुलीचा गळा चिरल्याचे कबूल केले.

Updated: Jun 10, 2018, 10:19 AM IST
अल्लाला खूश करण्यासाठी मुलीची कुर्बानी title=

नवी दिल्ली: अल्लाला खूश करण्यासाठी पोटच्या मुलीचा बळी (कुर्बानी) दिल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणी पीपरसीटी परिसरातून नवाब अली नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. जोधपूर ग्रामीण विभागाचे पोलीस अधिकक्षक राजन दुष्यंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब अली नावाच्या व्यक्तीची मोठी मुलगी रजवान (वय ४ वर्षे) हिचा मृतदेह त्याच्या घरून ताब्यात घेण्यात आला होता.

सखोल चौकशीत गुन्हा उघड

राजन दुष्यंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ताब्यात घेतला तेव्हा रिजनानचा मृतदेह गळा चिरल्याच्या आवस्थेत होता. मृतदेहाची आवस्था पाहून पोलिसांनी तपासासाठी श्वान आणि एफएसएल पथकाला पाचारण केले. तपासावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या नवाब अलीकडे पोलिसांनी सखोल चौकशी करताच त्याने आपणच आपल्या मुलीचा गळा चिरल्याचे कबूल केले. त्याने सांगितले की, रमजानच्या काळात अल्लाला खूश करण्यासाठी आपण हे कृत्य केले.

तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून बापाने चिरला मुलीचा गळा

पोलिसानी सांगितले की, नवाब अली हा रिजवानाला पहिल्या गुरूवारी बाजारात घेऊन गेला. बाजारात त्याने तिच्यासाठी खूप खेळणी आणि मिठाई खरेदी केली. त्याने मुलीला सांगितले की, बेटा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. दरम्यान, त्याच दिवशी रात्री उशीरा त्याने मुलीला आपल्या कुशीत घेऊन कुराण वाचले आणि त्यानंतर काहीच क्षणात त्याने मुलीचा गळा कापला. त्यानंतर तो पुन्हा रात्रीच्या अंधारात शांत झोपी गेला. आरोपी नवाब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.  दरम्यान,  तुझ्यावर खूप प्रमे करतो असे सांगणाऱ्या बापाने मुलीची गळा चिरून हत्या केल्याची घटना पाहून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.