दिल्लीत दिवसा अंधाराचे साम्राज्य, अनेक विमाने रद्द

दिल्ली एनसीआरमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास हवामान अचानक बदल झालेला पाहायला मिळाला. खराब हवामानामुळे दिल्लीकडे येणाऱ्या १८ विमानांचे मार्ग बदलण्यात आले. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 9, 2018, 11:24 PM IST
दिल्लीत दिवसा अंधाराचे साम्राज्य, अनेक विमाने रद्द title=
छाया - एएनआय

नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास हवामान अचानक बदल झालेला पाहायला मिळाला. सुमारे ताशी ८० कमी वेगाने धुळीचे वादळ सुटले होतं. या हवामान बदलामुळे ५ वाजताच अनेक भागांमध्ये अंधार पसरला आणि पावसाला सुरुवात झाली. खराब हवामानामुळे दिल्लीकडे येणाऱ्या १८ विमानांचे मार्ग बदलण्यात आले. 

देशाच्या दक्षिणी राज्यांसोबत महाराष्ट्रापासून मान्सून गुजरातकडे कूच करत आहे. कर्नाटकच्या किनारी भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये वेळेआधीच मान्सून पोहचलाय. हवामान विभागाने देशाच्या १२ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केलाय. 

Delhi-NCR hit by severe dust storm, several trees uprooted, flights diverted