मुंबई : आकाशात ३६ हजार फुटांवर पती पत्नीत 'तू तू मै मै' झाली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. आकाशात भांडणारे हे साधेसुधे नव्हते... पती पत्नी असलेल्या प्रत्यक्ष पायलट आणि को पायलटची विमानात मारामारी झाली. आपल्या भांडणात मश्गूल झालेल्या या दोघांनी आपली प्रत्येक जबाबदारी खुंटीला टांगली...
मुंबईला पोहोचण्यासाठी विमानाला आणखी पावणे तीन तासांचं अंतर कापायचं होतं... तेवढ्यात पायलट आणि को पायलटमध्ये कॉकपिटमध्ये भांडण पेटलं... भांडण एवढं पेटलं की पायलटने को पायलटच्या कानफटीत लगावून दिली...
त्यानंतर महिला को पायलट रडत कॉकपिटमधून बाहेर आली. त्यानंतर पायलटनेही प्रत्येक नियम धुडकावून लावत पत्नीशी झालेल्या भांडणात दोन वेळा कॉ़कपिटमधून बाहेर निघून आला. म्हणजेच शेकडो जणांचे प्राण त्यावेळी रामभरोसे होते.
सहकाऱ्यांनी समजूत काढल्यावर को-पायलटने पुन्हा एकदा कॉकपिटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि विमान चालवण्यात पायलटला साथ दिली... या फ्लाईटमध्ये २ मुलांसह ३२४ प्रवासी आणि १४ क्रू मेंबर होते.
पुढील तपास पूर्ण होईपर्यंत जेट एअरवेजने पायलट आणि को पायलटला निलंबित केलंय. याची माहिती डीजीसीएलाही देण्यात आलीय. त्यानंतर डीजीसीएने पुरूष पायलटचं फ्लाईंग लायसन्सही निलंबीत करण्यात आलंय. मात्र, एअरलाईन्सने या संपूर्ण घटनेला गैरसमज असल्याचं म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आता संसदेतही उमटलेत.
या सगळ्या प्रकारामुळे आता जेट एअरवेजवरही उचलले जातायत. मात्र झालेला प्रकार हा निश्चितच गंभीर आहे...