Indian Railways Package Tour Of Ramayana Yatra: देशातील लाखो भाविक दरवर्षी धार्मिक यात्रा करत असतात. पण कधी कधी प्लान करूनही योग जुळून येत नाही. त्यामुळे प्रत्येक जण योग्य संधीची वाट पाहात असतो. तुम्हीही धार्मिक यात्रा करण्याचा योजना आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वेनं तुमच्यासाठी खास पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही रामायण यात्रा (Ramayan Yatra) करू शकता. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी रामायण यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. होली रामायण यात्रा असे या रेल्वे पॅकेजचे नाव आहे. यात अयोध्या, सीतामढी अशा ठिकाणी फिरण्याची संधी मिळेल. अयोध्या, सीतामढी, जनकपूर, बक्सर, प्रयागराज, वाराणसी आणि चित्रकूटला भेट देण्याची संधी मिळेल. स्वदेश दर्शन टुरिस्ट ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळेल. यात तुम्हाला मोफत भोजन आणि निवासाची सुविधा मिळणार आहे. या पॅकेजचा तुम्हीही फायदा घेऊ शकता.
या पॅकेजमध्ये, स्टँडर्ड म्हणजेच स्लीपर क्लाससाठी प्रति व्यक्ती 15,770 रुपये आणि कंफर्ट क्लाससाठी प्रति व्यक्ती 18575 रुपये खर्च येईल. याशिवाय हॉटेलची सुविधा आहे. रुममध्ये डबल आणि ट्रिपल शेअरिंग बेड असतील.
Dive deep into devotion and spirituality with the HOLY RAMAYANA YATRA EX ITWARI tour package from #IRCTC. Visit Ayodhya, Sitamarhi, Janakpur, Buxar, Prayagraj, Varanasi & Chitrakoot to experience the utmost pious vibe. Package starting at ₹15,770 onwards.https://t.co/o8ZhwUKK4j
— IRCTC (@IRCTCofficial) November 21, 2022
ही रामायण यात्रा 18 फेब्रुवारी 2023 ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. हे पॅकेज पूर्ण 8 दिवसांसाठी असेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. याशिवाय दररोज 1 लिटर पाण्याची बाटली उपलब्ध असेल. या पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही http://bit.ly/3UWjxBF या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता.