Interesting Facts: मुलींच्या डाव्या तर मुलांच्या उजव्या बाजूला का असतात शर्टाची बटणं?

Interesting Facts: सध्या सगळीकडे युनिसेक्स फॅशनचा (Unisex Fashion) जमाना आहे. आता मुलींसाठी वेगळी फॅशन आणि मुलांसाठी वेगळी फॅशन असं काहीचं राहिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला आता हरएक तऱ्हेची फॅशन करायला वाव मिळतो आहे. 

Updated: Jan 1, 2023, 07:41 PM IST
 Interesting Facts: मुलींच्या डाव्या तर मुलांच्या उजव्या बाजूला का असतात शर्टाची बटणं?  title=

Interesting Facts: सध्या सगळीकडे युनिसेक्स फॅशनचा (Unisex Fashion) जमाना आहे. आता मुलींसाठी वेगळी फॅशन आणि मुलांसाठी वेगळी फॅशन असं काहीचं राहिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला आता हरएक तऱ्हेची फॅशन करायला वाव मिळतो आहे. त्यातून मुलांच्या मुलींच्या फॅशनमध्येही काही ठराविक फरकही असतात त्यातलाच एक फरक तुम्हाला जाणून घेयला आवडेल. तो म्हणजे शर्टच्या बटणांचा (Shirt Buttons). हल्ली मुलं काय मुली काय, सगळेच शर्ट आणि कॉर्पोरेट लुक म्हणून शर्ट परिधान करताना दिसतात. त्यामुळे शर्टची फॅशनही खूप प्रमाणात विकसित होत आहे. त्यातही अनेक स्टाईल आणि फॅशन येताना दिसत आहे. परंतु कितीही फॅशन आली अथवा बदलली तरी त्यातली एक गोष्ट बदलत नाही. ती तुम्ही ऑर्ब्झर्व्ह केली असेल तर तुम्हाला नक्कीच तो फरक जाणवेल. (Interesting Facts why women shirt buttons are on left side and men shirt button on right side)

हा फरक आहे तो म्हणजे शर्टवरील बटणांचा. वर म्हटल्याप्रमाणे, शर्टवरील बटणांची स्टाईल काही बदलत नाही. त्यामुळे आपणही कधी असा फारसा विचार करत नाही तर शर्टला बटणं का बरं असतात. त्यातून मुलींच्या शर्टची बटणं ही डाव्या बाजूला आणि मुलांच्या शर्टची बटणं ही उजव्या साईडला का असतात असा प्रश्नही तुम्हाला पडला असेलच. नसेल पडला तरीही तुम्ही ही इंटरेस्टिंग गोष्ट (Fashion) नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. 

मुलींच्या डाव्या बाजूला शर्टाची बटणं? 

गार्डियनच्या वृत्तात फॅशन क्षेत्रातील एका जाणकारानं याबद्दल माहिती देताना असं सांगितलं आहे की अनेकदा स्त्रियांना स्तनपान करण्यासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या शर्टाची बटणं ही डाव्या बाजूला असतात असं म्हटलं आहे. अनेकदा मुली या नोकरी करताना आपल्या लहानग्या बाळ्यांना सोबत घेऊन जाताना दिसतात. त्याचबरोबर अशीही परिस्थिती येते की स्त्रियांनी (Breast Feeding) जर शर्ट परिधान केला असेल आणि त्या कुठे ट्रॅव्हल करत असतील आणि त्यांच्या हातात बाळ असेल तर त्यांना स्तनपान करताना काही अडथळा येऊ नये म्हणून अशी फॅशन असते असे समजते. कारण स्तनपानासाठी स्त्रिया बाळांना डाव्या बाजूला ठेवतात, त्यामुळे शर्टाची बटणं डाव्या बाजूनला असण्याची शक्यता आहे. त्यांना डाव्या बाजूची बटणं लावायला आणि उघडायला सोप्पं जाते. 

मुलांच्या उजव्या बाजूला शर्टाची बटणं? 

.अशीही एक बातमी समोर येते की युद्धप्रसंगी पुरूष डाव्या बाजूला आपली हत्यारं ठेवायचे तेव्हा आपल्या डाव्या हातानं बटणं उडता यावीत म्हणून त्यांच्या शर्टाला उजव्या साईड बटणं असतात.

शर्टाची फॅशन विकसित झाली तेव्हा...

असा एक काळ होता जेव्हा लोकं फार कमी वेळी शर्ट वैगेरे घालायचे. त्यावेळी काही लोकांनी शर्ट देखील परवडणारे नव्हते. तेव्हा बहुतेक लोकं हे अंग झाकण्यासाठीही कपडे बांधूनच काम करायचे. त्यातून स्त्रिया शर्ट घालायला लागल्या तेव्हा ते फक्त श्रीमंतांचेच लक्षणं मानले जायचे. पुर्वी बटणं ही लोकं स्वत:च शिवून घ्यायचे असेही कळते. 

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)