भयानक योगायोग! ज्या ट्रेनखाली बहिणीचा मृतदेह सापडला त्याच ट्रेनमध्ये भाऊ झोपला होता

ज्या ट्रेनमधून प्रवास करत होता त्या ट्रेनखालीच बहिणीचा जीव गेला आहे. समोर बहिणीचा मृतदेह पाहून भावाच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे बहिणीचा अपघात झाला तेव्हा तिचा भाऊ याच ट्रेनमध्ये झोपला होता.

Updated: Jan 1, 2023, 07:38 PM IST
भयानक योगायोग! ज्या ट्रेनखाली बहिणीचा मृतदेह सापडला त्याच ट्रेनमध्ये भाऊ झोपला होता title=

Shocking News : जगभरात अनेक चित्र विचित्र योगायोग घडत असतात. उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) मात्र अत्यंत भयानक योगायोग घडला आहे. ज्या ट्रेनमधून प्रवास करत होता त्या ट्रेनखालीच बहिणीचा जीव गेला आहे. समोर बहिणीचा मृतदेह पाहून भावाच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे बहिणीचा अपघात झाला तेव्हा तिचा भाऊ याच ट्रेनमध्ये झोपला होता(Shocking News ). 

मृत महिला मटौंध थाना परिसरात राहत होती. यावेळी ती बकऱ्यांना चरण्यासाठी रेल्वे ट्रॅक लगत घेऊन गेली होती.  मुरेडी गावाजवळील रेल्वे ब्रीजजवळ एक बकरी थेट रेल्वे ट्रॅकवर गेली. इतक्यात समोरुन एक्सप्रेस ट्रेन धडधडत आली. यामुळे बकरीला वाचवण्यासाठी ही महिला देखील रेल्वे ट्रॅकवर गेली. मात्र, भरधाव रेल्वेने बकरीसह या महिलेला देखील उडवले.

बलिया एक्सप्रेसच्या धडकेत या महिलेचा जागीच मृत्यू झाला.  रेल्वे अपघात झाल्यामुळे बलिया एक्सप्रेस तब्बल अर्धा तास रेल्वे ट्रॅकवर मध्येच थांबली होती. सर्व प्रवाशी खाली उतरले. मृत महिलेचा भाऊ देखील या ट्रेनमधूनच प्रवास करत होता. अपघात झाल्यामुळे ट्रेन थांबली असल्याचे त्याला समजले.  ट्रेन सुरु व्हायला  बराच वेळ लागेल अशी माहिती त्याला इतर सह प्रवासांकडून मिळाली. यामुळे तो झोपी गेला. 

तासाभराने तो घरी आल्यावर त्याला बहिणीच्या मृत्यबाबत माहिती मिळाली. रेल्वेच्या धडकेत बहिणीचा मृत्यू झाल्याचे त्याला समजले. बलिया एक्सप्रेसच्या धडकेत बहिणीचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांनी त्याला सांगितले. कुटुंबियांनी दिलेली माहिती ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, अपघात झाल्याचे त्याला समजते. मात्र, त्याने अपघातग्रस्त व्यक्तीची चौकशी केली नाही. तो झोपून गेला. मात्र, त्या रेल्वे अपघातात मरण पावलेली व्यक्ती आपली बहिण असल्याचे त्याला समजल्यानंतर त्याचं डोकं सुन्न झालं. उत्तर प्रदेशातील बांदा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. पोलिांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

वैज्ञानिक कारणामुळे वाचला जीव 

सासरच्या त्रासला कंटाळून एक तरुण जीव देण्यासाठी थेट रेल्वे ट्रॅकवर(Railway track) आडवा झाला पण तो यातून आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. त्याला साधं खरचटल देखील नाही. उत्तर प्रदेश(Uttar pradesh) के गाजियाबाद येथे ही अजब घटना घडली आहे. वैज्ञानिक कारणामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.  आत्महत्या करायला निघालेल्या या तरुणानाने भगव्या रंगाचा टी शर्ट घातला होता. तो आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर पोहचला तेव्हा लोको पायलटने या तरुणाने घातलेल्या टीशर्टचा भगवा रंग पाहून तात्काळ ट्रेन थांबवली. लाल आणि भगव्या रंगाची वेव लेंथ (wavelength)अधिक परिणामकारक असते. यामुळेच भगवा रंग पाहून ट्रेनचा लोका पायलट अलर्ट झाला आणि त्याने तात्काळ ट्रेन थांबवली. भगव्या रंगाच्या टी शर्टमुळे या तरुणाचा जीव वाचला असे ट्रेनच्या लोको पायलटने सांगितले.