रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताय मग आधी ‘ही’ बातमी वाचा! तुमच्यासाठी घेतला मोठा निर्णय

IRCTC: भारतीय रेल्वेचे काही असे नियम आहेत, ज्यांची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची (important ) आहे. जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम...

Updated: Oct 14, 2022, 08:30 AM IST
रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताय मग आधी ‘ही’ बातमी वाचा! तुमच्यासाठी घेतला मोठा निर्णय title=

Destination Alert Alarm : प्रवासाचं स्वस्त आणि वेगवान साधन म्हणून भारतीय रेल्वेची (Indian Railways) ओळख आहे. रेल्वेने प्रवास (traveling ) करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणून प्रवाशांकडून रेल्वेला पसंती दिली जाते.   तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही रेल्वे (Railway) प्रवासादरम्यान गाढ झोपेत असाल आणि तुमचे गंतव्य स्थान म्हणजेच स्टेशन (Station) चुकले तर अशावेळी एकतर रात्रभर तुम्हाला शांत झोप ही लागणार नाही आणि सुविधांचा फायदा ही घेता येणार नाही. मात्र आता यावर रेल्वेने एक भन्नाट आयडिया काढली आहे. 

रेल्वेने तुमच्या या चिंतेवर उपाय शोधला असून तुमचा संपूर्ण प्रवासादरम्यान तुम्ही बर्थवर शांतपणे झोपू शकता. IRCTC ने प्रवाशांसाठी ही नवीन सेवा सुरु केली आहे. त्यामुळे प्रवाशांची झोप तर पूर्ण होईलच. पण त्याला इच्छित स्थळी ही उतरता येईल. IRCTC तुम्हाला तुमचे स्टेशन येण्याअगोदर अलर्ट करेल. त्यामुळे झोप तर पूर्ण होईलच पण तुमचे स्टेशनही चुकणार नाही. 

रेल्वेची नवीन सेवा काय आहे? 

'डेस्टिनेशन अलर्ट वेक अप अलार्म' (Destination Alert Wakeup Alarm) असे रेल्वेने सुरू केलेल्या या सेवेचे नाव आहे. रेल्वे बोर्डाकडे ट्रेनमध्ये झोपलेल्या लोकांची तक्रार गेली आहे. याची दखल घेत रेल्वेकडून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत उपलब्ध असेल. तुम्ही ही सुविधा घेतल्यास, सेवेअंतर्गत स्टेशनवर तुमच्या आगमनाच्या 20 मिनिटे आधी तुम्हाला अलर्ट मिळेल. या सेवेसाठी तुम्हाला फक्त 3 रुपये मोजावे लागतील. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रथम तुम्हाला IRCTC हेल्पलाइन 139 वर कॉल करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला पीएनआर क्रमांक (PNR Number) टाकावा लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेशनच्या 20 मिनिटे आधी वेकअप अलर्ट मिळेल. 

वाचा ं: Petrol-Diesel किती रुपयांनी स्वस्त झाले? जाणून घ्या आजचे दर

तुम्ही ही सेवा अशा प्रकारे घेऊ शकता

'डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म' सुरू करण्यासाठी तुम्हाला IRCTC हेल्पलाइन 139 वर कॉल करावा लागेल. भाषा निवडल्यानंतर, तुम्हाला प्रथम 7 क्रमांक दाबावे लागतील आणि नंतर गंतव्य अलर्टसाठी 2 क्रमांक दाबावे लागतील. आता विचारल्यावर तुमचा 10 अंकी PNR टाका. याची पुष्टी करण्यासाठी 1 डायल करा. असे केल्याने तुम्हाला स्टेशनवर येण्याच्या 20 मिनिटे आधी वेकअप अलर्ट मिळेल.