इन्कम टॅक्स विभागाचा इशारा, ४ दिवसांत हे काम उरकून घ्या...

टॅक्स भरणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. आयकर विभागाने नुकताच इशारा जारी केलाय. रिटर्न फाईल कऱणाऱ्यांना जर जाणूनबुजून अथवा चुकीने कोणतीही माहिती लपवली असेल तर ३१ मार्चपर्यंत तुम्ही या माहितीत बदल करु शकता. रिव्हाईज रिटर्न फाईल करुन तुम्ही लपवलेली माहिती देऊ शकता. ३१ मार्चपर्यंत असे न करणाऱ्यांवर विभाग कारवाई करेल. ज्यांनी इन्कमची माहिती लपवली असेल अशा लोकांवर आयकर विभाग कारवाई करेल. तसेच यासाठी आयकर विभागाकडून दंडही बसू शकतो.

Updated: Mar 28, 2018, 12:54 PM IST
इन्कम टॅक्स विभागाचा इशारा, ४ दिवसांत हे काम उरकून घ्या... title=

मुंबई : टॅक्स भरणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. आयकर विभागाने नुकताच इशारा जारी केलाय. रिटर्न फाईल कऱणाऱ्यांना जर जाणूनबुजून अथवा चुकीने कोणतीही माहिती लपवली असेल तर ३१ मार्चपर्यंत तुम्ही या माहितीत बदल करु शकता. रिव्हाईज रिटर्न फाईल करुन तुम्ही लपवलेली माहिती देऊ शकता. ३१ मार्चपर्यंत असे न करणाऱ्यांवर विभाग कारवाई करेल. ज्यांनी इन्कमची माहिती लपवली असेल अशा लोकांवर आयकर विभाग कारवाई करेल. तसेच यासाठी आयकर विभागाकडून दंडही बसू शकतो.

होऊ शकतो तुरुंगवास 

आयकर विभागाने स्पष्ट केलंय की आयटीआरमध्ये गडबड झाली असल्यास आणि ते प्रकरण गंभीर असेल तर त्या लोकांना तुरुंगवासही होऊ शकतो. तुम्ही बँक अकाऊंटमध्ये मोठी रक्कम जमा केली असेल वा मोठ्या रकमेचे व्यवहार केली असेल तर रिवाईज्ड आयटीआरमध्ये त्याची माहिती देणे बंधनकारक असेल. 

दोन्ही कारवाईही शक्य

इन्कमबाबत चुकीची माहिती अथवा कोणतीही माहिती लपवल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई होऊ शकते. याचाच अर्थ आयकर विभाग दंड वसूल करेल त्याबरोबरच शिक्षाही होऊ शकते. 

काळ्या पैशाविरोधात अॅक्शन प्लान

इन्कम टॅक्स विभागाचा हा अॅक्शन प्लान काळ्या पैशाविरोधातील अभियानाचा एक भाग आहे. दरम्यान रिटर्न फाईल करताना अनावधानाने चूक झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी विभागाने ३१ मार्चपर्यंत मुदत दिलीये.

काय म्हणतात टॅक्स एक्सपर्ट्स

टॅक्स एक्सपर्ट्सच्या मते नोटाबंदीनंतर आयकर विभाग प्रत्येक व्यवहारांवर लक्ष ठेवून आहे. आयकर विभागाने अशी लिस्टही बनवलीये ज्यांच्याविरोधात बेनामी संपत्ती अथवा काळ्या पैशाचे प्रकऱण आहे. त्यामुळे अशा व्यक्ती आयकर विभागाच्या कचाट्यातून सुटणे कठीण आहे.