नेत्रहीन मुलांना जन्म दिल्याने सुनेला काढले घराबाहेर

हुंड्यासाठी अथवा मुलगी जन्माला आली म्हणून सुनेचा सासरी छळ केल्याचे तुम्ही ऐकले असेल मात्र बिहारच्या वैशालीमध्ये मुलगा झाला म्हणून सासरच्या लोकांनी सुनेला घराबाहेर काढल्याची घटना घडलीये. हे ऐकण्यामध्ये तुम्हाला थोडे विचित्र वाटेल मात्र ही खरी घटना आहे. वैशाली जिल्ह्यातील महुआ येथे राहणाऱ्या कांतीदेवी यांचे दहा वर्षापूर्वी लग्न झाले. सुरुवातीच्या काळात सगळं काही चांगल होतं. मात्र मुलाच्या जन्मानंतर घरात वादावादी सुरु झाली.

Updated: Mar 28, 2018, 11:26 AM IST
नेत्रहीन मुलांना जन्म दिल्याने सुनेला काढले घराबाहेर title=

पाटणा : हुंड्यासाठी अथवा मुलगी जन्माला आली म्हणून सुनेचा सासरी छळ केल्याचे तुम्ही ऐकले असेल मात्र बिहारच्या वैशालीमध्ये मुलगा झाला म्हणून सासरच्या लोकांनी सुनेला घराबाहेर काढल्याची घटना घडलीये. हे ऐकण्यामध्ये तुम्हाला थोडे विचित्र वाटेल मात्र ही खरी घटना आहे. वैशाली जिल्ह्यातील महुआ येथे राहणाऱ्या कांतीदेवी यांचे दहा वर्षापूर्वी लग्न झाले. सुरुवातीच्या काळात सगळं काही चांगल होतं. मात्र मुलाच्या जन्मानंतर घरात वादावादी सुरु झाली.

घरच्यांचे सततचे टोमणे

कांती यांना तीन मुलगे झाले. मात्र तीनही मुले नेत्रहीन आहेत. मुलांच्या वडिलांनी तसेच घरच्यांनी उपचारांची शर्थ केली मात्र काहीच सुधारणा झाली नाही. तिन्ही मुलांच्या उपचारासाठी पाण्यासारखा पैसा खर्च झाला. कांतीच्या सासरचे लोक यावरुन त्यांना चांगलेच टोमणे मारु लागले होते. घरच्यांच्या टोमण्यांना कंटाळून कांतीच्या पतीने अखेर तिला मुलांसह तिच्या माहेरी आणून सोडलेय.

मोठा गाजावाजा करत कांतीच्या वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले होते. मात्र अशा पद्धतीने मुलगी माहेरी आल्याने वडिलांना मात्र काळजी लागून राहिलीये. आपली अशी काय चूक झाली की आपल्या मुलीला असे माहेरच्या जीवावर रहावे लागतेय हाच विचार करत कांतीचे वडील आलेला दिवस ढकलतायत. कांती आणि तिचे वडील सध्या चहाचे दुकान चालवतात आणि त्याच्यावर आपल्या तीन मुलांचा गुजराणा करतात.