तुम्ही IRCTC कडून तिकिटे बुक करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा! रेल्वेकडून मोठी माहिती

जर तुम्ही देखील IRCTCमधून तुमच्या रेल्वेचे तिकिटे बुक करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे.

Updated: Sep 24, 2021, 02:14 PM IST
तुम्ही IRCTC कडून तिकिटे बुक करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा! रेल्वेकडून मोठी माहिती title=

मुंबई : जर तुम्ही देखील IRCTCमधून तुमच्या रेल्वेचे तिकिटे बुक करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने म्हटले आहे की, त्याची वेबसाइट पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित आहे. सर्व बातम्या फेटाळून, IRCTC ने स्पष्टपणे म्हटले आहे की, कोणतीही व्यक्ती त्याच्या वापरकर्ता लॉगिन आयडी आणि पासवर्डशिवाय इतर कोणत्याही वापरकर्त्याचे तिकीट रद्द करू शकत नाही. IRCTC पूर्णपणे सुरक्षित आहे.

अलीकडेच, बारावीच्या एका विद्यार्थ्याने ई-तिकिटिंग प्लॅटफॉर्मवर 'बग'ची माहिती दिल्याची घटना समोर आली. परंतु IRCTC च्या तंत्रज्ञान संघाने विद्यार्थ्याच्या माहितीवर कारवाई केली आणि ही समस्या त्वरित सोडवली. 2 सप्टेंबर रोजी आयआरसीटीसीने ही समस्या दूर केली होती.

पूर्णपणे सुरक्षित वेबसाइट

IRCTC ने सांगितले आहे की, त्याची वेबसाइट पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणजेच यात कोणाच्याही गोपनीयतेला धक्का लागत नाही किंवा ती संपुष्टात येत नाही. IRCTC ने असेही म्हटले आहे की, वेबसाइटचे नियमित थर्ड पार्टी ऑडिट होते. रेल्वेचे हे ई-तिकिटिंग प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुरक्षित प्रणाली आहे. ज्यात त्याच्या प्रकारची अद्वितीय सायबर सुरक्षा तंत्रज्ञान आहे. हे नेटवर्क, सिस्टम आणि अॅप्लिकेशन लेयरचे पूर्णपणे संरक्षण करते.

या प्रणालीचे नियमितपणे ऑडिट केले जाते. आयआरसीटीसी वेबसाइट वापरकर्त्यांच्या बँक व्यवहारांची सुरक्षा देखील सुनिश्चित करते आणि जेव्हाही कोणत्याही वापरकर्त्याकडून किंवा व्यक्तीकडून 'बग' किंवा इतर कोणत्याही समस्येबद्दल माहिती प्राप्त होते, तेव्हा त्यावर त्वरित कारवाई देखील केली जाते.

पीटीआयच्या वृत्तानुसार, चेन्नईच्या तांबरम येथील एका खाजगी शाळेत शिकत असलेल्या 12 वीच्या विद्यार्थी पी रंगनाथन याने 30 ऑगस्ट रोजी IRCTC च्या वेबसाइटवर 'बग' ची तक्रार केली होती. ही माहिती भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद संघाला (CERT-In) देण्यात आली.

यावर आयआरसीटीसीच्या तंत्रज्ञान ग्रुपने त्वरित कारवाई केली आणि 2 सप्टेंबर रोजी समस्या दूर केली. 'या अहवालात सांगितले गेले होते की बगद्वारे कोणी दुसऱ्याची माहिती घेऊ शकते. यावर, IRCTC स्पष्टपणे सांगितले आहे की, हे अजिबात शक्य नाही आणि IRCTC चा प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुरक्षित आहे.