नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल देवराज अन्बू यांनी पाकला इशारा दिला आहे..
पाकिस्तानने आपल्या वर्तणुकीत जर सुधारणा केली नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करावं लागेल , असं अन्बू यांनी म्हण्टलं आहे.
लेफ्टनंट जनरल देवराज अन्बू हे उत्तर मुख्यालयाचे जनरल ऑफिसर आहेत.ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, लाइन ऑफ कंट्रोलसारखी अशी कुठली लाइन नाही. जी पार केली जाऊ शकत नाही, हे आम्ही सर्जिकल स्ट्राइक करून दाखवून दिलं आहे.
आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही ती सक्षमपणे पार करू. गरज पडल्यास आम्ही पुन्हा पलीकडे जाऊन हल्ला ही करू, असे सांगत टेरर फंडिंग प्रकरणी फुटीरतावादी नेत्यांवर एनआयएने सुरू केलेल्या कारवाईमुळे काश्मीर खोऱ्यातील दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे त्यांनी सांगितले.