मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. परंतु तरीही ती परीक्षा देण्यासाठी तरुणाई मागे हटत नाही. यापरीक्षेसाठी मुलचं नाहीत तर मुली देखील उतरल्या आहेत आणि मुलांच्या खांद्याला खांदा लावून परीक्षाच नाहीतर. काम देखील करत आहेत. महिलांनी आपल्या कामाचा ठसा देखील उमटवला आहे. अशीच कहाणी आहे IAS अधिकारी स्मिता सभरवाल यांची, ज्यांना 'पब्लिक ऑफिसर' असे ही म्हटले जाते. यांनी अगदी कमी वयात आयुष्यातील इतका मोठा पल्ला गाठला आहे.
स्मिता सभरवाल या दार्जिलिंग, पश्चिम बंगालमधील आहे. त्यांचे वडील प्रणव दास हे भारतीय लष्करात कर्नल म्हणून निवृत्त झाले आहेत. वडील लष्करात असल्यामुळे स्मिता वेगवेगळ्या शहरात वाढल्या आहे. ज्यामुळे सहाजिकच त्यांचे शिक्षण देखील वेगवेगळ्या शाळांमध्ये झालं.
स्मिता सभरवाल सुरुवातीपासूनच अभ्यासात चांगल्या होती. त्या 12वीत ISC बोर्डात टॉपर होत्या. बारावीनंतर स्मिता वाणिज्य शाखेत पदवीधर झाल्या. स्मिता जेव्हा बारावीत आल्या तेव्हा पासूनच त्यांच्या वडिलांनी त्यांना नागरी सेवेत येण्यासाठी प्रोत्साहन दिले.
द बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, ग्रॅज्युएशननंतर स्मिता सभरवाल यांनी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, स्मिता पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी ठरल्या आणि प्रिलिम परीक्षाही पास करू शकल्या नाही.
पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतरही स्मिता सभरवाल यांनी हार न मानता दुसऱ्यांदा मेहनत घेऊन परीक्षा दिली. स्मिता यांनी 2000 साली UPSC परीक्षेत चौथा क्रमांक मिळवला आणि वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्या IAS अधिकारी बनल्या.
स्मिता सभरवाल, वाणिज्य शाखेतून पदवीधर असूनही, UPSC परीक्षेत त्यांनी पर्यायी विषय म्हणून मानववंशशास्त्र आणि लोक प्रशासन हे विषय निवडले. परीक्षेच्या तयारीबाबत स्मिता यांनी सांगितले की, त्या रोज सहा तास अभ्यास करायच्या आणि त्यासोबतच एक तास क्रीडा उपक्रमांसाठी काढायच्या. चालू घडामोडींच्या तयारीसाठी त्या वर्तमानपत्रे आणि मासिके वाचत असे.
स्मिता सभरवाल यांची पहिली नियुक्ती चित्तूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. त्या कडप्पा ग्रामीण विकास एजन्सीच्या प्रकल्प संचालक, वारंगलचे महानगरपालिका आयुक्त आणि कर्नूलच्या सह जिल्हाधिकारी राहिल्या आहेत. याशिवाय त्यांना विशाखापट्टणम आणि करीमनगर सारख्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. स्थानिक लोक आजही स्मिता यांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी स्मरणात ठेवतात आणि 'लोक अधिकारी' म्हणून ओळखले जातात.